बाभुळगावात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण

    दिनांक :30-Mar-2023
Total Views |
- विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संघटनेचा पुढाकार

बाभुळगाव, 
रामनवमी उत्सव समितीतर्फे शहरामध्ये गुडीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत विविध सामाजिक व धार्मिक कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बुधवार, 29 मार्च रोजी स्थानिक भारतमाता चौकामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक‘मास आमदार डॉ. अशोक उईके प्रामुख्याने उपस्थित होते. तालुक्यामध्ये शीत शवपेटी व ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर नसल्यामुळे बाहेरहून त्याची व्यवस्था करावी लागत असे. त्यामुळे या वस्तू वेळेवर मिळत नसूनही त्यासाठी पैसेही जास्त लागायचे. त्यामुळे Oxygen concentrator ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व शीत शवपेटी हे शहरात असणे आवश्यक होते.
 
 
Oxygen concentrator
 
Oxygen concentrator : यासाठी तालुक्यातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती व दुर्गावाहिनी या संघटनांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून या उपकरणांची खरेदी करून लोकार्पण करण्यात आले. या उपकरणासाठी तालुक्यातील नागरिकांना गरज पडल्यास 7875875737 किंवा 9921981999 वर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या वेळी कार्यक‘मास भाजपा तालुका अध्यक्ष सतीश मानलवार, नितीन परडखे, भगिरथ गुप्ता, नंदकिशोर गुप्ता, डॉ. लीना मुसळे, मु‘याध्यापक मालिनी पाटणे, गौतम लांडगे, अभय तातेड, सोनू शर्मा उपस्थित होते. कार्यक‘मासाठी विवेक बुरेवार, मयूर पिसे, आकाश शृंगारे, गौरव लोहकरे, तुषार गुप्ता, गोकुल बद्दर, वैभव लेंडे, चंद्रशेखर अलोणे, अनिकेत पोहोकार, शुभम सागळे, प्रतीक निवल, तुषार महानूर, आकांक्षा वर्मा, ललिता वर्मा, अनिता बद्दर, मंगला चन्ने, रूपाली फुलकर, अदिती फुलकर यांनी परिश्रम घेतले.