- अमित क्षत्रीय यांच्याकडे जबाबदारी
वॉशिंग्टन,
जन्माने भारतीय असलेले सॉफ्टवेअर व रोबोटिक अभियंते Amit Kshatriya अमित क्षत्रीय यांची अमेरिकन नासाच्या ‘चंद्र ते मंगळ’ या नव्या आणि तितक्याच महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रावर जास्तीत जास्त काळ राहून तिथूनच मंगळ ग्रहावर मनुष्य पाठविण्याच्या तयारीसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नासाच्या या नव्या मोहिमेसाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यालयाची सूत्रे क्षत्रीय यांनी तत्काळ प्रभावाने स्वीकारली आहेत. मानवी कल्याणासाठी चंद्र आणि मंगळावर मनुष्याचे अस्तित्व असे असू शकते, याचा आढावा घेण्याचा या मोहिमेमागील उद्देश असल्याची माहिती नासाच्या एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
दोन्ही ग्रहांवर मनुष्य पाठविण्याची ही मोहीम म्हणजे आमच्यासाठी एक सुवर्णकाळच ठरणार आहे. आमच्या या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी Amit Kshatriya क्षत्रीय आणि त्यांच्या चमूतील सदस्यांची महत्त्वाची मदत मिळणार आहे. मंगळावर मनुष्य पाठविण्याआधी चंद्रावर त्याचे जास्तीत जास्ती काळपर्यंत अस्तित्व असणे आवश्यक आहे, असे नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी यात म्हटले आहे. ‘चंद्र ते मंगळ’ या प्रकारचा हा जगातील पहिलाच प्रयोग असणार आहे. चंद्रावर जास्तीत जास्त काळपर्यंत मनुष्य राहू शकतो, हे जर आम्ही सिद्ध केले तर, पुढचा प्रयोग मंगळावर करण्यात येणार आहे, असे यात नमूद आहे.