प्रशांत कारुळकर यांचा भारतीय नौदलाकडून सन्मान

    दिनांक :31-Mar-2023
Total Views |
भोपाळ, 
प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते Prashant Karulkar प्रशांत कारुळकर यांना भारतीय नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल एस. एन. घोरमाडे यांच्या हस्ते पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे. भोपाळमध्ये लष्करी कमांडर्सची बैठक होत आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथसिंह उपस्थित आहेत, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी होणार्‍या या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. त्याच्या दोन दिवस आधी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक प्रशांत कारुळकर यांचा गौरव करण्यात आला.
 
 
prashant
 
कारुळकर यांना याआधीही विविध जागतिक दर्जाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम असोसिएशनचे सदस्य होणारे पहिले भारतीय दाम्पत्य होण्याचा मानही Prashant Karulkar प्रशांत कारुळकर आणि त्यांची पत्नी शीतल यांना मिळाला आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर प्रशांत कारुळकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या भावना व्यक्त केल्या, मी सन्मानचिन्ह स्वीकारून कृतार्थ झालो आहे. भारतीय नौदलातील कमांडिंग अधिकार्‍यांच्या दुसर्‍या पंक्तीतील व्हाईस अ‍ॅडमिरल एस. एन. घोरमाडे यांच्या हस्ते भोपाळ येथे मला सन्मानित करण्यात आले. 40 वर्षांपासून देशाची सेवा करणारे नौदलातील द्वितीय क‘मांकाचे अधिकारी यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आले. आम्ही समाजासाठी करीत असलेल्या कामाचे व्हाईस अ‍ॅडमिरल यांनी कौतुक केले. हे सामान्य नागरिकासाठी अशक्य आहे, हा गौरव पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.