‘डीजे’ची अफवा विरोधकांनी पसरवली

31 Mar 2023 20:57:31
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
Rumors of 'DJ' : काल श्रीरामनवमीला लक्षावधी अमरावतीकरांनी जल्लोष करून भगवान श्रीरामचंद्रांची आराधना केली. डीजेच्या आवाजाने पुलात भेग पडली ही अफवा रामनामाचे वावडे असलेल्या आणि कालचे विराट जनशक्तीचे दर्शन बघून हादरलेल्या विरोधकांनी पसरवू नये. रामभक्त अफवा पसरवणार्‍या मविआला योग्य जागा दाखवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे.
 
Rumors of 'DJ' 
 
बालाजी प्लॉट, राजापेठ, राजकमल, जयस्तंभ, जवाहर रोड ते गांधी चौक या मार्गावर एक काचही तडकला नाही. शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या इमारतीच्या खिडकीचे साधे दारही हलले नाही. आणि अत्याधुनिक आरसीसी उड्डाणपूल थोड्या अधिक वजनाने किंवा कुठल्यातरी आवाजाने तडकत असेल तर त्या पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता तपासणे अधिक आवश्यक आहे. पुलाला भेगा पडल्याच्या घटनेचा प्रभू श्रीरामांच्या शोभायात्रेशी संबंध लावणे ही हिंदू विरोधी मानसिकता आहे. अल्पसंख्य समुदायाच्या गठ्ठा मतांसाठी हा ’बादरायण’ संबंध जोडणे आहे. श्रीरामाच्या अस्तित्वावर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या आणि श्रीरामभक्तांच्या अफाट शक्तीप्रदर्शनाने पोटात गोळा उठलेल्या लोकांनी काल पासूनच पुलाच्या भेगेसाठी शोभायात्रेतील डीजे कारणीभूत असल्याच्या अफवा पेरल्या आहेत. या पुलाच्या गुणवत्तेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी देखील शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. अशा अफवा पसरवून अमरावतीकर रामभक्तांचा अपमान कोणीही करू नये. पोलिसांनी देखील अफवा पसरवणार्‍यांना समज द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली.
 
Powered By Sangraha 9.0