दारव्हा,
Sindhutai Deshpande एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व, सदैव चेहर्यावर स्मितहास्य ठेवून जगणार्या सिंधुताई..! त्यांचे माहेरचे आडनाव सिंधू रामराव देशपांडे (तिवरीकर). बालपण ग्रामीण भागात गेले. Sindhutai Deshpande त्यांचा विवाह दारव्हा येथील रामदास गाभे यांच्याशी झाला. पती रामदास यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करायचे. Sindhutai Deshpande त्यावेळी जेमतेम पगार असायचा. कुटुंब मोठे ! गजानन, विजय, नीला, शीला, माला, निमा व वंदना ही अपत्ये ! Sindhutai Deshpande हा संसाराचा गाडा समोर नेत असताना जेमतेम आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागला. Sindhutai Deshpande अशा परिस्थितीतही त्यांच्या चेहर्यावर कधीही दु:खाची छटा दिसत नसल्याने, त्यांना ‘प्रेमळ सिंधुताई’ म्हणायचे.
Sindhutai Deshpande जसजशी मुले मोठी होत गेली, तसे मुलांचे शिक्षण, मुलींचे शिक्षण, विवाह हे सर्व प्रश्न समोर येत असताना न डगमगता सर्व गोष्टींचा सामना करीत त्या सामोरे जात होत्या. गजानन हा मोठा मुलगा जेव्हा शाळेत नोकरीला, तर विजय हा जीवन विमा कंपनीत नोकरीला लागला तेव्हा कुठे थोडी आर्थिक सुधारणा होऊ लागली. Sindhutai Deshpande मुलांचे लग्न झाले. गौरी व चित्रा या मनमिळाऊ सुना मिळाल्या. मुलींचेही लग्न झाले. Sindhutai Deshpande अशा प्रकारे त्यांनी खंबीरपणे एक यशस्वी व आदर्श संसार उभा केला. बिकट परिस्थितीत त्यांना मनोहरराव मोहरील, कुसुमताई मोहरील यांचे अमूल्य असे सहकार्य लाभले.
Sindhutai Deshpande सिंधुताई संसार नेटका करीत होत्या, त्यातही त्यांना अध्यात्माची आवड होती. सुख-दुःखात कुसुमताई पांडे, कमलताई पांडे, निर्मलाताई टोपरे यांची तसेच इतर स्नेहींशी त्यांचे प्रेमळ संबंध होते. Sindhutai Deshpande असा सिंधुताईंचा प्रवास 20 फेब्रुवारी 2023 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी देवाज्ञा झाल्याने खंडित झाला. Sindhutai Deshpande त्यांच्या जाण्याने संपूर्ण गाभे परिवार तसेच सर्व स्नेही स्वजन दुःखसागरात बुडाले. त्यांच्या पावन स्मृतीस शतश: नमन..!
श्याम पांडे, दारव्हा (मनभेकर परिवार)
गजानन गाभे, विजय गाभे, चिन्मय, सर्वज्ञ गाभे परिवार, दारव्हा