आकाशातून टेहळणी करतील भारतीय जवान

05 Mar 2023 18:20:28
- ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ची यशस्वी चाचणी
 
नवी दिल्ली, 
दुर्गम सीमा भागांत शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आता भारतीय जवान पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडून टेहाळणी करू शकतील. भारतीय सैन्याने ब्रिटिश कंपनीकडून Jetpack flying suit जेटपॅक फ्लाईंग सूट मागवले आहेत. त्याची चाचणी नुकतीच उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घेण्यात आली. देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय सैन्य सातत्याने आधुनिकरणाची योजना आखते. याचाच एक भाग म्हणून भारतीय लष्कराने ग्रव्हिटी इंडस्ट्रीज या ब्रिटिश कंपनीने विकसित केलेल्या जेटपॅक सूटची चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आग्रा येथील इंडियन आर्मी एअरबॉर्न ट्रेनिंग स्कूलमध्ये (एएटीएस) नुकतेच या उपकरणाचे प्रात्यक्षिक पार पडले आहे. जेटपॅक सूट हे वैयक्तिक उड्डाण तंत्रज्ञान आहे. जे एखाद्या व्यक्तीला शरीराला जोडलेले लहान पण, शक्तिशाली इंजिन वापरून उड्डाण करू देते.
 
 
Jetpack flying suit
 
या Jetpack flying suit सूटला तीन लहान जेट इंजिन असतात. ते परिधानकर्त्याला हालचाली आणि उड्डाणाची दिशा नियंत्रित करण्यास मदत करतात. या सूटच्या माध्यमातून भारतीय जवान एखाद्या सुपरहिरोप्रमाणे हवेत उडू शकतील. प्रात्यक्षिकादरम्यान एका व्यक्तीने तो परिधान करून 51 किलोमीटर अंतर कापरले. ती व्यक्ती प्रात्यक्षिकात रस्ते, इमारती आणि नद्या ओलांडताना दिसला. हा सूट परिधान करून 12 हजार फूट उंचीवर जाता येत असल्याचे त्यांनी सांगितले. रिचर्ड ब्राऊनिंग यांनी ढोलपूर येथील आर्मी स्कूलमध्ये त्यांच्या जेट पॅक सूटचे प्रात्यक्षिक दिले होते. व्हिडीओमध्ये ब्राउनिंग जेट पॅक सूट घातलेला दिसत आहे, ज्यात तीन जेट इंजिन आहेत. यातील एक पाठीमागे आणि दोन हातांवर आहेत. जानेवारीमध्ये भारतीय सैन्याने फास्टट्रॅक प्रकि‘येद्वारे 48 जेटपॅक सूट खरेदी करणार असल्याचे सांगितले. सध्या भारतीय लष्कर पूर्व लडाखच्या सीमेवर झालेल्या वादानंतर जवळपास 3500 किमी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाळत ठेवत आहे. त्यामुळे हे जेट पॅक सूट जवानांना मदत करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0