लडाखमधील दोन हिमनद्या मागे सरकल्या

    दिनांक :05-Mar-2023
Total Views |
-शास्त्रज्ञांनी दिला इशारा
 
नवी दिल्ली, 
भौगोलिक आणि हवामान शास्त्रीयदृष्ट्या लडाख हे संवेदनशील क्षेत्र आहे. अशातच लडाखमधील दुरंग ड्रंग आणि पेनसिलुंगपा या दोन glacier हिमनद्या मागे सरकत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या दोन्ही नद्या 1971 ते 2019 या काळात अनुक‘मे 7.8 चौरस किमी आणि 1.5 चौरस किमी मागे सरकल्या आहेत. याबाबत चिंता व्यक्त करीत शास्त्रज्ञांनी हिमनद्या वितळण्यासाठी वातावरणातील बदलांसह अन्य घटकांना जबाबदार मानले आहे.
 
 
glacier
 
वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीचे (डब्ल्यूआयएचजी) शास्त्रज्ञ मनीष मेथा, विनितकुमार, पंकज कुनमार आणि कमलाचंग सैन यांनी लिहिलेले निष्कर्ष नुकतेच ‘सस्टेनेबिलिटी’ या आंतरराष्ट्रीय पीअर-रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे, वांगचूक यांच्या नेतृत्वात लडाखमधील दोन तृतीयांश हिमनद्या वितळल्याने संवेदनशील क्षेत्राची जपणूक व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर काही आठवड्यातच हा अहवाल आला आहे.
 
 
लडाखमधील 14,612 फूट उंचीवर पेन्सी-ला खिंडीत या हिमनद्या आहेत. डीडीजी हिमनदी 72 वर्ग किमी पसरलेली आहे. या glacier नदीने 7.8 चौरस किमी बर्फ गमावला आहे. हा बर्फ डीडीजी नदीच्या पृष्ठभागाच्या 10 टक्के आहे. पीजी हिमनदी 16 चौरस किमीत पसरली असून, ती 1.5 चौरस किमी मागे सरकली आहे. हे प्रमाण त्याच्या क्षेत्रफळाच्या आठ टक्के आहे. 1971 ते 2019 या कालावधीत डीडीजी हिमनदी दरवर्षी 13 मीटर आणि पीजी glacier हिमनदी दरवर्षी 5.6 मीटर मागे गेली. केवळ हवामानातील बदलामुळेच लडाख ग्लेशियर प्रभावित होत नाही तर, हिमनद्यांचे ‘टोपोग्राफिक सेंटिंग आणि मॉर्फोलॉजी’मुळेही प्रभावित होतात. या दोन्ही हिमनद्या एकाच भौगोलिक परिस्थितीत स्थित आहेत. या एकसारख्या हवामान परिस्थितीचा सामना करीत आहेत तरीही, दोघींचे क्षेत्र वेगवेगळ्या पद्धतीने मागे सरकले आहे. यावरून असे दिसून येते की, हिमनद्यांवर वेगवेगळे घटक प्रभाव टाकतात. हिमनदीचा आकार, उंची, श्रेणी, उतार, पैलू, मोडतोड आवरण तसेच सुप्रा आणि प्रोग्लेशियल तलावांची उपस्थिती अभ्यासलेल्या हिमनद्यांच्या विषम प्रतिसादावर परिणाम करीत आहे, असे या अभ्यासाचे प्रमुख मनीष मेथा यांनी सांगितले.