डोडामध्ये लष्कराने 100 फूट उंचावर राष्ट्रध्वज फडकवला

09 Mar 2023 18:36:38
डोडा, 
भारतीय लष्कराने जम्मू-काश्मिरातील डोडा जिल्ह्यात गुरुवारी 100 फूट उंंचावर National Flag  राष्ट्रध्वज फडकावला. देशासाठी प्राणार्पण करणार्‍या जवानांसाठी ही योग्य श्रद्धांजली असल्याचे लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितले. चिनाब खोर्‍यातील क्षेत्रात लष्कराने फडकावलेला दुसरा उंच राष्ट्रध्वज आहे. पूर्णतः सफाया होण्याआधी दशकभरापूर्वी हे दहशतवादाचे केंद्र होते. मागील वर्षी जुलै महिन्यात किश्तवाड येथे 100 फूट उंचीवर राष्ट्रध्वज फडकावण्यात आला होता.
 
 
Doda National Flag
 
डोडा स्पोर्ट्स स्टेडियम येथे लष्कराच्या डेल्टा फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अजयकुमार यांनी हा National Flag  तिरंगा फडकावला. यावेळी राष्ट्रीय रायफल सेक्टर नऊचे कमांडर बि‘गेडियर समीर के. पलांदे, डोडाचे उपायुक्त विशेष पॉल महाजन आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक अब्दुल कयूम उपस्थित होते. कार्यक‘मादरम्यान देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या तसेच राष्ट्र उभारणीत मोठे योगदान देणार्‍या नागरिकांचा सन्मान मेजर जनरल कुमार यांनी केला. देशाची एकता आणि अखंडतेसाठी हुतात्मा झालेल्या लष्कराच्या जवानांना या उंच राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्यात आली आहे, असे कुमार म्हणाले.
Powered By Sangraha 9.0