प्रीती पवारचे लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धेवर

    दिनांक :01-Apr-2023
Total Views |
नवी दिल्ली :
जागतिक स्तरावर छाप पाडल्यानंतर Preeti Pawar प्रीती पवारचे लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याकडे लागलेले आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणून असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली, तर ती या स्पर्धेतून धडे गिरविण्यास उत्सुक आहे. अलीकडेच पार पडलेल्या जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत 19 वर्षीय प्रीतीने आपल्या 54 किग्रॅ वजनी गटाच्या तीनही लढतीत निर्भयपणे खेळाचे प्रदर्शन केले. तिने गत विश्व स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्‍या रोमानियाच्या लॅक‘ामिओरा पेरीजोकवर शानदार विजय नोंदविला.
 
 
PREETI-PAWAR
 
मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत Preeti Pawar प्रीतीचे आव्हान संपुष्टात आले. तिला दोन वेळा पदकविजेत्या थायलंडच्या जितपॉन्ग जुटामास हिच्याकडून अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. यादरम्यान, प्रीतीने दाखविलेल्या लढाऊवृत्तीची सर्वांनी प्रशंसा केली. मला वाटते की माझ्या खेळात बदल करण्याची गरज आहे. मला आणखी प्रतिकार करण्याची गरज आहे. मी माझी ताकद व तंत्र सुधारण्यावर काम करीत आहे, असे प्रीती म्हणाली. मी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली, तर खूप बरे होईल. मला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी तयार व्हायचे आहे, असेही ती म्हणाली.