मुंबईच्या समुद्रात संशयास्पद बोट...राज्यभर अलर्ट जारी

    दिनांक :01-Apr-2023
Total Views |
मुंबई,
Arabian Sea : मुंबईच्या अरबी समुद्रात पालघर येथे एक संशयास्पद बोट निदर्शनात आली आहे. या बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून ही बोट शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील संशायस्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक जॉईंट ऑपरेशन सेंटर नावाची एक संस्था बनवण्यात आली आहे. या संस्थेकडून पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसल्याची आणि त्यावर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Arabian Sea
 
पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पाकिस्तानी नागरिक या (Arabian Sea) बोटीवर असल्याचे निदर्शनास येत आहे. गेटवे ऑफ इंडियापासून ही बोट दक्षिणेकडे ५० नॉटिकल मील दूर पालघरमध्ये दिसली आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणा या बोटीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ही बोट शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यानुसार मुंबईच्या किनारपट्टीजवळ एका लाईट हाऊसच्या जवळच ही बोट दिसली. त्यात दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर सर्व संरक्षण संस्था सक्रिय झाल्या आहेत. सागरी पोलीस आणि नौदलाकडून ही बोट शोधण्याचं काम सुरू आहे.