बेंबळा धरणात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

    दिनांक :01-Apr-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, 
बेंबळा धरणाच्या (Bembala Dam) पाण्यात कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना पहूर परिसरात 31 मार्च रोजी उघकीस आली. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात या बाबाबत चर्चेला पेव फुटले आहे. मृदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान बाभुळगाव पोलिसांसोमर उभे ठाकले आहे.
 
(Bembala Dam)
 
पहूर परिसरातील बेंबळा धरणाच्या (Bembala Dam) बुडीत क्षेत्रात ढोले यांच्या शेताजवळ एका इसमाचा मृतदेह कुजलेला अवस्थेत आढळून आला. या बाबातची माहिती पहूर येथील पोलिस पाटील पुष्पा जयस्वाल यांनी बाभुळगाव पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढले. त्यांचे वय अंदाजे 35 ते 40 असून हातावर गोंदवलेले आहे. हा मृतदेह मागील 5 ते 6 दिवसांपासूनच आसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पहूर प्राथमिक केंद्रातील डॉ. शुभम अग्रवाल यांना घटनास्थळीच मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याने आत्महत्या केली की घातपात या चर्चेला पेव फुटले आहे.