तभा वृत्तसेवा
पुसद,
धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा ज्योतीबा फुले, Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2023 चा तिसरा दिवस आंबेडकरी साहित्यिक तसेच देशातील तृतीयपंथी लोकांच्या चळवळीच्या नेत्या दिशा पिंकी शेख यांचा व्या‘यानाने लक्षवेधी ठरला. लुंबिनी महिला मंडळ संभाजीनगर आणि संबोधी महिला मंडळ श्रावस्तीनगर यांनी बुद्धवंदना घेऊन कार्यक‘माची सुरवात केली. अध्यक्षस्थानी मोहिनी इंद्रनील नाईक होत्या, तर दुसर्या वक्त्या प्रा. ज्योती खंदारे होत्या. त्यांनीसुद्धा महात्मा फुले ते Dr. Babasaheb Ambedkar बाबासाहेब आंबेडकर हा महिलांच्या हक्क अधिकाराचा इतिहास सांगितला.
रक्षाबंधनाला सगळ्या बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात आणि त्याला गळ घालतात की तू आमची रक्षा कर. पण Dr. Babasaheb Ambedkar बाबासाहेब आंबेडकर हा महिलांचा असा भाऊ आहे की ज्याला महिला ओवाळत नाहीत किंवा राखी बांधत नाही तरी तो भारतातल्या प्रत्येक महिलेच्या संरक्षणासाठी धावून येतो. त्यामुळे प्रत्येक भारतीय स्त्रीने बाबासाहेबांचे रोज स्मरण केले पाहिजे, असे प्रतिपादन मोहिनी नाईक यांनी केले.
हिंदू महिलांना त्याचे हक्क अधिकार मिळावे म्हणून हिंदू कोड बिलावर राजीनामा देणारे Dr. Babasaheb Ambedkar डॉ. आंबेडकर हे पहिले नेते आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय हक्कवंचित समुदायात ते सर्वात आधी महिलांना मिळावे यासाठी प्रयत्न बाबासाहेबांनी केले. त्यांचे असे मत होते की, कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजावी. अगदी युरोपातसुद्धा महिलांना साध्या मताच्या अधिकारासाठी लढावे लागले. पण बाबासाहेबांनी भारतीय महिलांना सर्व अधिकार विनासायास मिळवून दिले. त्यामुळे बाबासाहेब हेच भारतीय महिलांचे उद्धारकर्ते आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मीनाक्षी मोटघरे, माया ठोके, सीमा तायडे, दीपाली धुळे, प्रियांका खाडे, छाया हंबर्डे, पंचशीला कांबळे, अर्चना खंदारे, गीता कांबळे, अश्विनी पुनवटकर, अस्मा मिर्झा, शाहिदा रेहमान, मोहम्मदी बेगम, शीतल ढगे आदी उपस्थित होत्या. कार्यक‘मासाठी किशोर कांबळे, नत्थुजी वाहुळे, नारायण ठोके, नितेश खंदारे, संतोष गायकवाड, अंबादास वानखेडे, प्रफुल भालेराव, विष्णू सरकटे, परमेश्वर खंदारे, प्रीतम आळणे, राजू पठाडे, समाधान केवटे, जगदीश सावळे, मुन्ना हाटे, संजय वाढवे, प्रा. सुनील खाडे, राजू पठाडे, विकास मनवर, साहेबराव गुजर, सुरेश कांबळे, बाळासाहेब कांबळे, अंबादास कांबळे, मधुकर सोनोने, दिनेश सावळे, रंगराव बनसोड यांनी परिश्रम घेतले.