पुसदची वाटमारी : तिन्ही आरोपी पकडले

11 Apr 2023 19:45:40
तभा वृत्तसेवा
पुसद, 
पुसद शहर पोलिस (Pusad City Police) ठाण्यात रविवार, 9 एप्रिल रोजी दाखल वाटमारीच्या गुन्ह्यातील तिन्ही संशयित आरोपी पकडले आहेत. या गुन्ह्यातील तक्रारकर्ता महागाव तालुक्यातील वाळवागदचे अनिल राठोड त्यांच्या आईच्या रक्ताचा नमुना उपचाराच्या अनुषंगाने घेऊन बरखा टॉकीजच्या पाठीमागील रस्त्याने मोटरसायकलने जात होते. यावेळी एका इसमाने मध्ये येऊन त्यांना थांबविले. त्याचवेळी बाजूला थांबलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील रोख 2000 रुपये व मोबाईल 13 हजार असा एकूण 15 हजारांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला.
 
Pusad City Police
 
पुसद शहर पोलिस (Pusad City Police) ठाणे डीबी पथक अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी पोचून तातडीने शोध घेऊन आरोपी रोहित, ओम व विनोद या तीन आरोपींना अवघ्या दोन तासांत शिताफीने अटक केली. या गुन्ह्यात जबरीने नेलेली रोख, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि चाकू जप्त करण्यात आली आहे असून अधिक तपास उपनिरीक्षक सावळे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0