विवेकानंद पॉलिटेक्निकमध्ये ज्योतिबा फुले जयंती साजरी

    दिनांक :12-Apr-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
गोबरवाही, 
Jyotiba Phule : जवळील सितासावंगी येथील विवेकानंद पॉलिटेक्निक मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्या इरशाद अंसारी व कर्मचाèयांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. प्रसंगी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून समाजात वावरतांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सामाजिक दायीत्वदेखील सांगण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रा.कमलाकर निखाडे, राजेश ठाकूर, शामल मन्ना, आशिष दहिवले, संतोष झोडे, रहमान खान, अमर भारद्वाज, ललित तिवारी, ॠषभ बानासुरे, अनिल डहरवाल, कर्मचारी सुरेश अवथरे, ओमकार डहरवाल, प्रमोद कापगते, विजय भोयरकर, मनोज ठाकूर, वसंत झंझाड आदी उपस्थित होते.

Jyotiba Phule