असे दिसायचे...प्रभू श्रीराम २१ वर्षांचे असताना

    दिनांक :12-Apr-2023
Total Views |
नागपूर, 
Prabhu Shri Ram : समाज माध्यमांवर सध्या AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून प्रभू श्रीराम २१ वर्षांचे असताना कसे दिसायचे, या संदर्भातील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. AI द्वारे निर्मित प्रभू रामचंद्रांचा हा फोटो ते २१ - २२ वर्षांचे असताना कसे दिसत असतील, याचा विचार करून तयार करण्यात आला आहे.

Prabhu Shri Ram
 
२१ वर्षाचे असतानाचे प्रभू श्रीराम (Prabhu Shri Ram) यांच्या चेहऱ्यावर तेज आणि स्मितहास्य पाहायला मिळत आहे. ‘प्रभू श्रीरामचंद्र २१ वर्षांचे असताना असे दिसत असतील’ अशा कॅप्शन्ससह हा डिजिटल फोटो अनेकांनी शेअर केला आहे. अनेक यूजर्सनी रामचंद्रांच्या मनमोहक रुपाचे वर्णन केले आहे. हे अप्रतिम सुंदर डिजिटल चित्र तयार करणाऱ्या कलाकाराची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण नेटकऱ्यांनी प्रभू श्रीरामाचा हा फोटो तयार करणाऱ्या कलाकाराचे तोंडभरून कौतुक केले आहे. वाल्मीकी रामायण आणि रामचरितमानससह अनेक ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वय वर्ष २१ असताना भगवान रामांचे AI निर्मित चित्र' अशा टॅगलाईन सोबत काही युजर्सनी हा फोटो शेयर केला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने फोटोला उद्देशून ‘पृथ्वीवर रामांपेक्षा सुंदर पुरुष नाही’ अशी कमेंट केली आहे.