नदीत बुडून अभियंता युवकाचा मृत्यू

12 Apr 2023 20:27:39
हिंगणघाट, 
Drowning in River : शहरातील सिमंत ऊर्फ अजिंक्य नीळकंठ कुबडे (२४) या अभियंता असलेल्या अविवाहित युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज घडली.
 
 Drowning in River
 
स्थानिक गोमाजी वार्ड येथील रहिवासी असून आज तो आपल्या वडिलांसह वेणा नदीवर डंकिन परिसरात पोहण्यासाठी गेला होता. पोहण्यासाठी त्याने खोल पाण्यात त्याने उडी घेतली असता तो पाण्याखाली असलेल्या गोटयावर आदळला. त्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अजिंक्य हा आय.टी. अभियंता असून पुण्याचे एका कंपनीत काम करीत होता. सद्या तो घरूनच काम करीत होता. सदर युवक कुटुंबातील एकुलता एक कर्ता मुलगा असून त्याला बहीण, आई, वडील असा आप्तपरिवार आहे.
  
Powered By Sangraha 9.0