तभा वृत्तसेवा
गोंदिया,
जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसताना मोठ्या प्रमाणात Sand thief वाळूचे अवैधरित्या उत्खनन, वाहतुक व विक्री सुरू आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बळगा उगारला आहे. वैनगंगा नदीच्या किन्ही घाटावरून वाळूचे उत्खनन करून वाहतुक करणार्या आरोपीला मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई बुधवार 12 एप्रिल रोजी तालुक्यातील फत्तेपूर-ओझाटोला मार्गावर गंगाझारी पोलिसांनी केली. याप्रकरणी वाहनचालक राहुल देवेंद्र सरोदे (23) व मालक सोमा लक्ष्मण बरैया (45) दोन्ही रा. नवेगाव, धापेवाडा, ता. जि. गोंदिया असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
जिल्ह्यात अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरूद्ध धडक कारवाईची मोहिम पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या निर्देशानुसार सुरू आहे. गंगाझरी पोलिसांना मिळालेल्या येथील गुप्त माहिती वरून बुधवारी संध्याळी 7 वाजेच्या सुमारास फत्तेपुर ते ओझाटोलाकडे जाणार्या मार्गावर अवैधरीत्या Sand thief वाहन क्रमांक एमएच 32 क्यू 2351 मध्ये वाळूची वाहतुक करताना पोलिसानी पकडले. 6 लाख रुपये किमतेचे वाहन, 6 हजार रुपये किमतीची वाळू असा 6 लाख 6 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यसात आला. कारवाई गंगाझरीचे ठाणेदार महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरिक्षक पोपट टिळेकर, पोहवा मनोहर अंबुले, चालक पोलिस हवालदार तुळशीदास पारधी, पोलिस नायक महेंद्र कटरे, हरीश कटरे यांनी केली.