मुलांना पुस्तकांकडे नेऊया : जिल्हाधिकारी अमोल येडगे

    दिनांक :14-Apr-2023
Total Views |
- ‘अमृतकुंभ अमृतवाचन’ उपक्रमांतर्गत पुस्तकांचे वितरण

यवतमाळ, 
हल्ली पालकांचाच ‘स्क्रीन टाईम’ वाढल्याने मुलंही त्यांचेच अनुकरण करत आहे. मात्र मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि आपल्या कुटुंबात सकारात्मक बदल करण्यासाठी पालकांनी स्वत:सह मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांना पुस्तकांकडे नेले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी Amol Yedge अमोल येडगे यांनी केले.
 
 
Amol yedge
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद सभागृहात ‘अमृतकुंभ अमृतवाचन’ पुस्तक संच वितरणाच्या कार्यक‘मात ते आज गुरूवारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ होते, तर प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ललित वर्‍हाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, वित्त व लेखाधिकारी ज्योती भोंडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सौ स् थे चे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, समाज कल्याण अधिकारी पीयूष चव्हाण, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी उपस्थित होते.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जेवणाचे पैसे पुस्तकांवर खर्च करीत. पुस्तकांची किंमत महापुरूषांनी जाणली होती. पुस्तके हीच त्यांची संपत्ती होती, असे सांगून जिल्हाधिकारी येडगे यांनी वाचनाने बौद्धिक संपदेत भर पडण्यासोबतच नवीन माहिती कळते, विचार प्रगल्भ होतात असे सांगितले. यवतमाळ जिल्ह्यास ‘एलपीडी’मधून बाहेर काढण्यासाठी विविध उपक‘म सुरू आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. झेप, महादीप, लेखन वाचन कार्यक‘मानंतर अमृतकुंभ हे विद्यार्थी व शिक्षकांसाठी फिरते वाचनालय यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या उपक‘मासाठी विविध शैक्षणिक, कर्मचारी संघटनांसह अधिकारी, कर्मचार्‍यांनी पुस्तके दान द्यावीत व वाचन चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी Amol Yedge येडगे यांनी यावेळी केले.
 
 
निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्‍हाडे यांची बदली झाल्याने त्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वर्‍हाडे यांनी, आज मुले मोबाईल, टिव्हीमध्ये गुंतले असून त्यांचे वाचन कमी झाले आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान पालकांसह शिक्षकांसमोर असल्याने अमृतकुंभ उपक‘मातून मुलांना वाचनीय पुस्तके देवून त्यांचे वाचन वाढविण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. चांगला माणूस घडविण्यासाठी वाचनसंस्कार गरजेचे आहे, असेही ललितकुमार वर्‍हाडे यांनी आवर्जून सांगितले.
 
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अमृतकुंभ उपक्रम विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ‘गाव तेथे वाचनालय’ हा उपक्रमही जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उपशिक्षणाधिकारी राजू मडावी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महागाव तालुक्यातील मुडाणा, केळापूर तालुक्यातील मोहदा आणि यवतमाळ तालुक्यातील तिवसा शाळांना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते अमृतकुंभ हा 221 पुस्तकांचा संच वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोरी जोशी यांनी केले, तर आभार पोपेश्वर भोयर यांनी मानले. कार्यक्रमास वरिष्ठ अधिव्या‘यात डॉ. राऊत, डॉ. सावरकर, अधिव्याख्याता नितीन भालचक‘, बोडखे, किरण रापतवार, सारिका पवार, उपशिक्षणाधिकारी श्रीधर कनाके, विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, विषय तज्ज्ञ शिल्पा पोलपे‘ीवार यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक आदि उपस्थित होते.
पुस्तके लवकर जुनी व्हावीत !
अमृतकुंभ हा 221 पुस्तकांचा संचात विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त अशी पुस्तके आहेत. पहिल्या टप्प्यात 32 शाळांना हे संच दिले आहेत. पुस्तकांची देवाण-घेवाण अधिक प्रमाणत करून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक पुस्तके वाचावी आणि ती लवकर जुनी व्हावीत, असेही जिल्हाधिकारी Amol Yedge यावेळी म्हणाले.