अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचा मोठा झटका!

    दिनांक :14-Apr-2023
Total Views |
नवी दिल्ली,
दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने CBI called Kejriwal आम आदमी पार्टीवर (आप) कारवाई सुरू केली आहे. सीबीआयने 16 एप्रिल रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपास पथकाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी केजरीवाल यांना सकाळी ११ वाजता मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. 
 
 
gyt
 
दारू व्यापाऱ्यांना परवाने CBI called Kejriwal देण्यासाठी दिल्ली सरकारच्या 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणाने काही विक्रेत्यांना अनुकूलता दर्शवली, ज्यांनी त्यासाठी लाच दिली असा आरोप आहे. 'आप'ने हा आरोप ठामपणे फेटाळून लावला. नंतर पॉलिसी रद्द झाली. उत्पादन शुल्क धोरणात सुधारणा, परवानाधारकांना अवाजवी लाभाची मुदतवाढ, परवाना शुल्कात सूट/कपात, एल-1 परवान्याची मंजुरी न घेता मुदतवाढ आदींसह अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला. सीबीआयच्या प्रवक्त्याने 17 ऑगस्ट 2022 रोजी एफआयआर नोंदविल्यानंतर सांगितले होते की, "या कृत्यांमुळे खाजगी पक्षांनी संबंधित लोकसेवकांना त्यांच्या खात्यांच्या वहीत खोट्या नोंदी करून बेकायदेशीर लाभ दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. "