तभा वृत्तसेवा
मुंबई,
धर्माधिकारी कुटुंबीय राज्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करीत असून, ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. (Appasaheb Dharmadhikari) उद्ध्वस्त कुटुंबांना सावरण्याचे काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले असून, आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहेत. माणसं घडविण्याचे विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. या सोहळ्याला मी एक श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसागराला अभिवादन केले.
ठिपक्या ठिपक्यांनी रांगोळी तयार होते; तसे माणसं जोडून माणुसकीचा महासागर (Appasaheb Dharmadhikari) आप्पासाहेबांनी निर्माण केला आहे. ‘अरे माणसा कधी व्हशील माणूस तू...’ या बहिणाबाईंना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आप्पासाहेबांच्या माणूस घडविण्याच्या याच कार्यातून मिळते. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबिर, जलसंधारण, ग्रामस्वच्छता, शिक्षण, मार्गदर्शन अशा सर्व मार्गांनी आप्पासाहेबांनी समाज घडविला आहे. त्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठान मला एखाद्या दीपस्तंभासारखे वाटते, असे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणाले.
आप्पासाहेबांकडे मन स्वच्छ करण्याची कला : उपमुख्यमंत्री
जगात सात आश्चर्य आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय, हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्री सदस्यांकडे बघून समजते. निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची अद्भूत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आहे. आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे आप्पासाहेबांच्या माध्यमातून अद्भूतरीत्या जतन आणि संवर्धन होत आहे. (Appasaheb Dharmadhikari) आप्पासाहेबांना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्त्व आज निश्चितच वाढले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
मुख्यमंत्री शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने यावेळी लाखोच्या संख्येने उपस्थित श्री सदस्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाची क्षणचित्रे
मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाषणाची सुरुवात जय सद्गुरू म्हणत केल्यावर श्री सदस्यांनी प्रचंड टाळ्या वाजविल्या, 30 लाखांपेक्षा अधिक श्री सदस्य शिस्तबद्ध रितीने बसून होते, (Appasaheb Dharmadhikari) मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे आणि पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील आपल्या परिवारासह सर्वसामान्य श्री सदस्यांसारखे गर्दीत उन्हात बसून कार्यक्रम पाहत होते. कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशातूनही भाविक या कार्यक्रमासाठी दाखल झाले होते