गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीतच शिक्षा व्हावी

अतिक अहमदप्रकरणी खडगे यांची भूमिका

    दिनांक :16-Apr-2023
Total Views |
नवी दिल्ली,
गुन्हेगारांना कठोर शिक्षा (Atiq Ahmed case) व्हायलाच हवी, पण ती कायद्याच्या चौकटीतच. कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी कायद्याचा दुरुपयोग करणे लोकशाहीसाठी घातक आहे, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी रविवारी विशद केली. उत्तरप्रदेशात कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफच्या हत्येप्रकरणी खडगे बोलत होते.
 
Atiq Ahmed case
 
गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी आपल्या देशात न्यायालय आहे. मात्र, न्यायाच्या मार्गाने न जाता कायदा हातात घेण्याची वृत्ती देशात अराजकतेला जन्म देणारी ठरू शकते, असे खडगे यांनी हिंदीतून केलेल्या काही ट्विट्समध्ये म्हटले आहे. ज्या महापुरुषांनी आपल्या देशाची घटना तयार केली, ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. घटना आणि कायदा दोन्ही श्रेष्ठ आहे. कुणीही त्यांचा दुरुपयोग करू नये. (Atiq Ahmed case) गुन्हेगाराला कोणती शिक्षा द्यायची, हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. कोणत्याही सरकारला हा अधिकार असू शकत नाही, असे त्यांनी अन्य एका ट्विटमध्ये नमूद केले.
 
 
ओवैसींनी केली योगींच्या राजीनाम्याची मागणी
अतिक व अशरफच्या हत्येवर (Atiq Ahmed case) एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांनी थयथयाट केला. थंड डोक्याने करण्यात आलेले हे हत्याकांड असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा तसेच या हत्याकांडाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
उत्तरप्रदेशात भाजपा कायद्याने नाही तर बंदुकीने राज्य चालवत आहे. 2017 पासून आपण हेच पाहात आहोत. (Atiq Ahmed case) अतिक व त्याच्या भावावर ज्या पद्धतीने गोळीबार करण्यात आला, ते लक्षात घेता, तिन्ही मारेकरी हे व्यावसायिक शूटर असल्याचे दिसते. पोलिस आणि पत्रकारांच्या उपस्थितीत हत्याकांड करणारे हे लोक कोण आहेत आणि त्यांना कुणाचे संरक्षण आहे, असा सवाल ओवैसी यांनी केला.