वन नियमांत अडकलेले मारुती मंदिराचे प्रवेशद्वार खुले करा

16 Apr 2023 20:40:56
तभा वृत्तसेवा 
आर्णी, 
Maruti temple : मांगुळ या गावाचा तालुका नकाशावर उजाड गाव म्हणून आजही उल्लेख आढळतो. तेथे वस्ती होती. कालांतराने येथील लोक वेगवेगळ्या गावी विस्थापित झाली परंतु त्यांची शेत जमीन वनविभागाला लागून असलेल्या क्षेत्रात आहे. त्या जमिनीचा सात बारा मंगरूळ, (मांगुळ) या नावानेच असल्याने त्या उजाड जागेवरील मारुती मंदिर हे आजूबाजूचा परिसर आणि इतर जिल्ह्यांतील भाविक, नागरिकांचे श्रद्धास्थान आहे व 1967-68 पासून श्री हनुमंत महाराज व आई यांची एका घराची वस्ती आजही आहे.
 
Maruti temple
 
आजही येथे दर शनिवारी शेकडोंच्या सं‘येने हनुमान मंदिरात आरतीच्या वेळी भक्तगण उपस्थित राहतात. आपली पूजाअर्चा करून देवाच्या नावावर रोट करण्याची परंपरा आजही कायम आहे. परंतु वनविभागाने या जागेवर वनपर्यटन केल्याने या मंदिराला बंदिस्त केले आहे. या ठिकाणी वनकायदा लागू झाल्याने प्रवेशद्वार कुलूपबंद झाल्याने भाविकांना मंदिरात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. हा परिसर आता वनविभागाच्या चक‘व्यूहात अडकला असल्याची जाणीव भक्तांना झाली आहे. त्यामुळे या मारुतीचे पंचक‘ोशीतील नागरिक आता वनपर्यटनाऐवजी या मारुती मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या, अशी मागणी करणार आहेत.
 
 
वनविभागाच्या बंधनातून मारुती मंदिर मुक्त करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे मारुती देवस्थानचे अध्यक्ष हनुमंत उर्फ श्यामराव सातपुते महाराज म्हणाले. मी 1967-68 पासूनचा रहिवासी असून मंदिर परिसरातच वास्तव्य करीत आहे. मी या मंदिर समितीचा अध्यक्ष आहे. माझे आधारकार्डसुद्धा याच गावचे आहे. 2012 मधे ग‘ामपंचायत कुर्‍हा व भानसरा (वन) या ग‘ामपंचायतींकडून वनपर्यटनासाठी ठराव घेण्यात आला. यामध्ये मला काहीही कल्पना न देता परस्पर ठराव घेऊन त्या गावठाणावर मारुती मंदिर व माझ्या घराची जागा सोडून वनपर्यटन मंजूर केले आहे. बांबूची लागवड करून ही जागा बंदिस्त केली आहे, असेही ते म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0