तभा वृत्तसेवा
दर्यापूर,
रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांकडून शहरातील मरीमाता मंदिरातील (Marimata temple) दगडी मूर्तींची नासाधुस करण्यात आली. पहाटे भक्त मंदिरामध्ये पूजा करण्याकरिता आले असता तेथील मूर्त्यांची नासधूस दिसून आली. घटनेची माहिती वार्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी जमली.
ठाणेदार संतोष ताले व सुनील साबळे यांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस कर्मचार्यांनी तात्काळ हजर होत मंदिराची (Marimata temple) संपूर्ण पाहणी केली. त्याचबरोबर उर्वरित मूर्त्या व्यवस्थित ठेवण्यात आल्या. हा प्रकार अज्ञात वेडसर व्यक्तीकडून झाला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. झालेल्या घटनेचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणीला पोलिसांकडून सुरुवात झाली आहे. शहरातील विविध दलांच्यावतीने घटनेची सखोल चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा करणयची मागणी यावेळी करण्यात आली.
अफवांवर विश्वास ठेवू नका
शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी समाजातील नागरिकांनी शांतता ठेवावी. सदर घटनेची सखोल चौकशी पोलिस प्रशासनाकडून प्रारंभ करण्यात आली आहे. अज्ञात माथेफिरूकडून हे कृत्य झाले असल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शहरवासीयांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- ठाणेदार संतोष ताले (दर्यापूर)