नागपूर,
दिव्यांग जनक्रांती संघटनेतर्फे (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान मंदिराजवळ, चंदन नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा. संजय नाथे, विशाल भुजाडे, अनुपमा नगरकर, सागर मेश्राम, विशाल बागडे उपस्थित होते.
मंचावर उपस्थित पाहुण्यांनी दिव्यंगांच्या कल्याणार्थ कुठल्या योजना आल्या आहेत व येणाऱ्या काळात दिव्यांगांकरिता स्वतंत्र मंत्रालयामार्फत रोजगाराच्या संधी आणि येणाऱ्या अडचणींबाबत काय मदत करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले, (Dr. Babasaheb Ambedkar) कार्यक्रमाचे संचालन विशाल बागडे यांनी तर आभार सागर मेश्राम यांनी मानले, कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बंधु-भगिनी व वसाहतीतील नागरिक उपस्थित होते.
सौजन्य : मीना पाटील, संपर्क मित्र