तभा वृत्तसेवा
अमरावती,
साप्ताहीक अमरावती - पुणे हमसफर एक्सप्रेस (Humsafar Express) सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. त्यानुसार मंगळवार 18 एप्रिलला ही गाडी अमरावती स्थानकावरून रवाना झाली. खासदार नवनीत राणा यांनी हिरवी झेंडी दाखविली.
हमसफर एक्सप्रेस (Humsafar Express) पुण्यावरून दर सोमवारी अमरावतीसाठी रवाना होईल तर अमरावतीवरून पुण्यासाठी दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल. मंगळवार 18 एप्रिल रोजी खासदार नवनीत राणा यांनी चालक यादव व सहचालक यांचा शाल, श्रीफळ, हार घालून सत्कार केला. त्यानंतर खा. नवनीत यांनी हिरवी झेंडी दाखवून गाडी रवाना केली. सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
ही गाडी (Humsafar Express) सुरू झाल्याने युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यांना प्रवासाची उत्तम सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवासी नागरिकांनी खा. नवनीत यांचे आभार मानले आहे. यावेळी स्टेशन प्रबंधक महेन्द्र लोहकरे, डि. के. मीना, संजय वर्मा, अरविंद गुप्ता, एस. पी. कुर्हाडे, संजय इंगळे, धनराज कुमार, डी. एस. खडसे, यांच्यासह युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितु दुधाने, सुमती ढोके, संजय हिंगासपुरे, अजय जयस्वाल, सुधा तिवारी, विनोद जायलवाल, सचिन भेंडे, विनोद गुहे, अविनाश काळे, पराग चिमोटे, गणेशदास गायकवाड, साक्षी उमप, खुशाल गोंडाणे,वैभव बजाज, रवी अडोकार, अजय बोबडे, चंदू जावरे, प्रवीण मोखळे, दीपक ताठोड, मंगेश कोकाटे यांच्यासह अन्य हजर होते.