बंगळुरू,
चेन्नई सुपर किंग्जने आरसीबीच्या (Chennai vs RCB) घरच्या मैदानावर झालेल्या उच्च धावसंख्येच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 धावांनी पराभव केला. 227 धावांचा पाठलाग करताना आरसीबी संघ 20 षटकात 8 गडी गमावून 218 धावाच करू शकला. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या बॅटकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र या सामन्यात कोहलीची बॅट चालली नाही.
चेन्नई सुपर किंग्जला (Chennai vs RCB) पहिल्याच षटकात पहिला यश मिळाले. विराट कोहली आकाश सिंगच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहली बाद झाल्यानंतर तुषार देशपांडेने महिपाल लोमराला बाद केले. महिपाल लोमरोरलाही आपले खाते उघडण्यात यश आले नाही. पण यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस यांनी डाव सांभाळला आणि दमदार फलंदाजी केली.
मॅक्सवेलने 8 षटकार ठोकले
वेगवान फलंदाजी करून ग्लेन मॅक्सवेल बाद झाला. (Chennai vs RCB) मॅक्सवेलने अवघ्या 36 चेंडूत 76 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 8 षटकार मारण्याचे काम केले. महेश तिक्षनने मॅक्सवेलला एमएस धोनीकरवी झेलबाद केले. दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 28 धावांची खेळी करत संघाला लक्ष्याच्या जवळ नेले. पाथीरानाच्या चेंडूवर शाहबाज अहमदला ऋतुराज गायकवाडने झेलबाद केले. तुषार देशपांडेच्या चेंडूवर लाँग शॉट मारण्याच्या प्रयत्नात पारनेल झेलबाद झाला.