मुंबई,
Apple Store प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेरीस ऍपल स्टोअर भारतात उघडले आहे. मुंबईतील ग्राहकांना सकाळी 11 वाजल्यापासून भारतातील पहिले अॅपल स्टोअर अनुभवता येणार आहे. अॅपल स्टोअरच्या उद्घाटनानिमित्त कंपनीचे सीईओ टिम कुकही भारतात पोहोचले आहेत. अॅपलचे पहिले स्टोअर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये सुरू झाले आहे. या स्टोअरच्या माध्यमातून अॅपलला भारतात आपली ऑफलाइन उपस्थिती वाढवायची आहे. कंपनीची उत्पादने याआधीही ऑफलाइन बाजारात विकली गेली असली तरी ती सर्व अधिकृत ऍपल रिसेलर स्टोअरमधून विकली गेली होती. आता तुम्हाला अॅपलचे स्टोअर अनुभवता येणार आहे.
स्टोअर सुरू होण्यापूर्वी टीम कुक भारतात पोहोचला होते. अशा प्रसंगी ते विविध सेलिब्रिटींना भेटले. सर्वप्रथम त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुंकेश अंबानी यांची भेट घेतली. Apple Store याशिवाय टिक कुकनेही वडा पाव ट्राय केला. हा फोटोही त्याने शेअर केला आहे. यावेळी ते माधुरी दीक्षितसोबत दिसत आहे. मुंबई व्यतिरिक्त Apple दिल्लीतही एक स्टोअर उघडत आहे, जे साकेतमध्ये उघडेल. दिल्लीत 20 एप्रिलला सुरू होणार आहे.