नागपूर,
kho kho camp उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांमध्ये देशी मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी म्हणून टिप टॉप कॉन्व्हेंट आणि सरस्वती कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी संयुक्तपणे kho kho camp खो- खो प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन विदर्भातील ज्येष्ठ खो-खो प्रशिक्षक डॉ. सुरेश उर्फ बाबुराव तेलंग यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. kho kho camp यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सीए अनंत अंजीकर व प्रशिक्षक मनोहर दीक्षित उपस्थित होते.
kho kho camp टिप टॉप कॉन्व्हेंटतर्फे पर्यवेक्षिका भारती मांडवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सुरेश तेलंग यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना आपल्या सिद्ध अनुभवांनी उद्बोधित केले. kho kho camp हे प्रशिक्षण टिप टॉप कॉन्व्हेंट तसेच जीवनछाया नगर, दीनदयाल नगर इ. वसाहतीतील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क आहे. कृपया सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. केतकी सिरास यांनी नागरिकांना केले आहे. kho kho camp
सौजन्य : केतकी सिरास, संपर्क मित्र