अब पछताये होत क्या.. जब चिडिया चुग गयी खेत..!

19 Apr 2023 21:24:10
रवी देशपांडे 
पुसद तालुका वार्तापत्र,  
इसापूर धरण (Isapur Dam) हे महाराष्ट्रातील पाचवे मोठे धरण आहे. या धरणाचा एकूण जलसाठा 44.28 टीएमसी इतका आहे. इसापूर धरणाला महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली तेव्हा मु‘यमंत्री वसंतराव नाईक होते. या धरणाला दोन कालवे, उजवा आणि डावा. उजवा कालवा मराठवाड्याला आणि डावा कालवा विदर्भातील पुसद व उमरखेड तालुक्यांना.
 
Isapur Dam
 
डाव्या कालव्याचे काम सुरुवातीला इसापूरकडून मुळाव्याकडे करण्यात आले. इसापूर, शेंबाळपिंपरी भागात या कालव्याची खोली पाहता नाईकांमुळेच डावा कालवा सुरू करण्यात आला. दुर्दैवाने नाईक साहेबांनंतर आलेल्या पुसद उमरखेडमधील नेतृत्वाने या डाव्या कालव्याकडे गांभीर्याने बघितलेच नाही. पाणी वाटपाचा मूळ करार काय होता, प्रत्यक्षात कसे पाणीवाटप झाले आणि त्यामुळे विदर्भावर जो अन्याय झाला त्याकडे लक्षच दिल्या गेले नाही. वसंतराव नाईकांनंतर महाराष्ट्राचे नेतृत्व शंकरराव चव्हाण यांच्याकडे गेले. त्यांची जलतज्ञ म्हणून ‘याती आहे. मु‘यमंत्रीपदामुळे मिळालेले अधिकार आणि पाण्याविषयीचा त्यांचा अभ्यास याचा उपयोग करून इसापूर धरणाच्या (Isapur Dam) उजव्या कालव्याकडेच पाणी नेण्यात आले आणि डावा कालवा अजूनही अपूर्णच आहे.
 
 
इसापूर धरणाचे कार्यालयही त्यांनी नांदेड येथे हलविले आणि हे धरण मराठवाड्यासाठीच आहे असे चित्र उभे केले. आता या घटनेला चाळीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. 2014 पर्यंत महाराष्ट्र मंत्रीमंडळात पुसदचे नाईक सातत्याने होते. 1992 मध्ये दीड वर्षाकरिता का होईना सुधाकर नाईक मु‘यमंत्री होते आणि त्यानंतर मनोहर नाईक 2014 पर्यंत कॅबिनेट मंत्री होते. सत्तेच्या दालनात असताना इसापूर धरणामुळे (Isapur Dam) पुसद, उमरखेडवर झालेल्या अन्यायाची दखल घेतल्या गेली नाही. आता 42 वर्षांनंतर पुसदचे राष्ट्रवादी काँग‘ेसचे आमदार इंद्रनील नाईक म्हणतात, ‘आम्ही रस्त्यावर उतरू..’ पुसद, उमरखेडवर अन्याय झाला तेव्हा ते बंगल्यातच होते. राज्याच्या सत्तेत सहभागी होते. निर्णय प्रकि‘येवर प्रभाव पाडण्या इतपत सत्ता त्यांच्याचकडे होती तेव्हा त्यांनी या बाबतीत ‘ब‘’ काढला नाही आणि आता रस्त्यावर उतरू, अशी भाषा करणे म्हणजे माळपठारावरील जनतेची दिशाभूल करणेच होय.
 
 
नाईकांचेच एक नजीकचे समजल्या जाणारे बीजी राठोड माजी मु‘यमंत्री सुधाकर नाईक यांच्या निधनानंतर खंडाळा येथे दरवर्षी 21 ऑगस्टला त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक‘म घेतात. प्रत्येक वेळी माळपठारावरील 40 गावांच्या पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मांडतात आणि या सभेत मनोहर नाईक असतील किंवा इंद्रनील नाईक हे त्यास दुजोरा देतात आणि हा प्रश्न आम्ही सोडवू असे चॉकलेट देतात. आता नुकतीच इंद्रनील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मोहिनी नाईक यांनी हा प्रश्न सोडवू अन्यथा रस्त्यावर उतरू अशी भाषा वापरली. याबाबत लोकांची प्रतिकि‘या अशी की, या भागात पूर्वी रस्ते नव्हते काय ? नाईकांनी हा खेळ आता थांबवला पाहिजे. माळ पठारावरील जनतेला नाईकांच्या निष्कि‘यतेची जाणीव आहे.
 
 
त्याचे प्रत्यंतर असे की, मागील विधानसभा निवडणुकीत माळपठार चाळीस गावांमधील मतदारांनी भाजपाचे उमेदवार निलय नाईक यांना भरभरून मते दिली आहेत. येणार्‍या निवडणुकीत आपले पानिपत होईल या भीतीने इंद्रनील नाईक माळपठारावरील प्रश्नांबाबत रस्त्यावर उतरू अशा घोषणा करीत आहेत. ‘अब पछताये होत क्या, जब चिडिया चुग गयी खेत..’ अशी लोकभावना आहे. हाच मुद्दा नुकताच भाजपाच्या डॉ. आरती फुपाटे यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला. पण याच आरतीताईंनी अल्पावधीतच शिवसेना ते राकाँ आणि राकाँ ते भाजपा असा प्रवास केला आहे. राष्ट्रवादी काँग‘ेसमध्ये असताना यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यावेळी त्यांना राजे मनोहर, युवराज इंद्रनील कसे आहेत हे माहीत नव्हते काय..?
 
Powered By Sangraha 9.0