आगग्रस्त कुटुंबाची शिव-भावे जीवसेवा

02 Apr 2023 16:51:35
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
Sri Ramakrishna Ashram : रामकृष्ण मठ नागपूर यांच्या दिशानिर्देशांनुसार संचालित विवेकानंद सोसायटी जामनकर नगरस्थित श्रीरामकृष्ण आश्रम, यवतमाळ आध्यात्मिक तथा सेवाभावी कार्यासाठी प्रसिद्ध आहे. नुकत्याच यवतमाळ शहराला लागून असलेल्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीने पीडित झालेल्या कुटुंबाला श्री रामकृष्ण आश्रम यवतमाळतर्फे रविवार, 2 एप्रिलला दर महिन्यातील मानवसेवा निमित्य शिवभावे जीवसेवा करण्यात आली. त्यामध्ये तीन कुटुंबांना आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले.
 
Sri Ramakrishna Ashram
 
यामध्ये स्वयंपाकासाठी व जेवणासाठी लागणारी भांडी, चटई, मच्छरदाणी, बकेट, मग, कप, पाणी बॉटल, झाडू व घरातील स्त्रियांसाठी साडी इत्यादी वस्तू एज्युटेक संस्थेचे प्रतिनिधी मोहित ढोले व आश्रम पदाधिकार्‍यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मान्यवरांना व लाभार्थ्यांना आश्रमतर्फे प्रतिमा भेट देऊन त्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर समस्त पदाधिकारी, भक्त व मान्यवरांतर्फे साहित्य प्रदान करण्यात आले. या सेवेंने आपद्ग‘स्त लाभार्थी यांना समाधान लाभले. बहुसं‘य भक्तांनी शिवभावे जीवसेवा उपक‘माला उपस्थिती दर्शविली. आगग‘स्त कुटुंब सदस्यांना आश्रमतर्फे अल्पोपहार देण्यात आला. शिवभावे जीवसेवा उपक‘मासाठी श्रीरामकृष्ण आश्रमचे अध्यक्ष व समस्त पदाधिकारी, भक्त व देणगी दाते यांनी सहकार्य केले.
 
Powered By Sangraha 9.0