दुचाकी अपघातात दोन ठार एक जखमी

20 Apr 2023 20:14:09
वणी, 
वणीत दुचाकीने तिबल सीट आलेल्या मजुरांचा परत जाताना मोहुर्लीजवळ भीषण अपघात झाला. या accident अपघातात 2 मजूर जागीच ठार झाले तर एक जखमी आहे. बुधवारी रात्री 10 च्या सुमारास हा अपघात झाला. रतिकांत अनंतराय राऊत (28, मूळ रहिवासी ओरिसा), चंदनकुमार (25, मूळ रहिवासी बिहार) व सुजन मोडिकोरा (28, मूळ रहिवासी बंगाल) हे तिघे काही काळापासून मोहुर्ली येथील एका कारखान्यात कामगार म्हणून काम करतात. कंपनीच्या आवारातच ते राहतात.
 
 
Accident dksl
 
एकत्र काम करत असल्याने या तिघांची मैत्री होती. बुधवार, 19 एप्रिल रोजी कारखान्याला सुटी असल्याने रात्री 9 च्या सुमारास या तिघांनी दुचाकी वाहन क्र. एमएच40 एडब्ल्यू0179 ने जत्रा रोड परिसरात जाऊन तिथे त्या तिघांनी मद्यप्राशन केले. मद्यपान केल्यानंतर ते कारखान्यात दुचाकीने परत जात होते. मात्र मोहुर्ली गावाजवळ त्यांची भरधाव दुचाकी एका खड्ड्यात गेली. त्यामुळे चालक चंदन याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. गाडी घसरली आणि घासत रस्त्याबाहेर गेली. त्यामुळे गाडीवरील तिघेही दूर फेकले गेले. या accident अपघातात दुचाकी चालक चंदन व मागे बसलेला सुजन याला गंभीर दुखापत झाली. तर तिसरा रतिकांत हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावरील लोकांनी रुग्णवाहिका बोलावली व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी चंदन व सुजन यांना मृत घोषित केले. तर रतिकांतवर उपचार सुरू आहेत. प्रकरणाची चौकशी वणी पोलिस करत आहेत.
Powered By Sangraha 9.0