वर्धा,
blast at Thanegaon कारंजा घाडगे तालुक्यातील ठाणेगाव येर्हे प्रियांशु विनोद उके, ( 8) याला घरासमोर रस्त्यावर बेवारस स्थितीत असलेले डीटोनेटर मिळाले. 20 रोजी घरी खेळत असताना त्याने घरातील डीटीएचचे रिमोट मधील पॅनासोनीक कंपनीचा सेल काढून सृष्टी उके (14) हिला वायर लावण्यास सांगितले व स्वतःचे हातात डीटोनेटर पकडला.
सेलला वायर लावतात त्याचा स्फोट होऊन प्रियांशूच्या डाव्या हाताचा पंजा गंभीर जखमी झाला तसेच सृष्टी सुद्धा किरकोळ जखमी झाली. दोघांनाही खाजगी रुग्णालय घाडगे हॉस्पिटल, कारंजा येथे भरती केले आहे. blast at Thanegaon असाच डिटोनेटर काही दिवसांपूर्वी तळेगाव येथे एका किराणा दुकानापुढे आढळला होता.