स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास सर्वांसमोर आला

    दिनांक :21-Apr-2023
Total Views |
- ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती, त्याग, त्यांचे बलिदान कुठल्याही शब्दांत व्यक्त करता येत नाही, त्यांचा त्याग सर्वश्रूत आहे. त्यांनी केलेले देशकार्य शब्दांच्या पलीकडे आहे. असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर अनुवादित Veer Savarkar ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकातून सर्वांसमोर आला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 

vir savarkar 
 
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर व चिरायू पंडित यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या ‘द मॅन हू कुड प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे उदय निरगुडकर यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असलेला महापुरुष’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
 
 
मुख्यमंत्री म्हणाले, Veer Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकर जाणून घ्यायचे असतील तर, हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे. सावरकरांबाबत ब्रिटिशांच्या मनात भीती होती. त्यांना दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा त्यांनी सुनावली. सावरकर यांनी अंदमानच्या कारागृहात अत्यंत हाल अपेष्टा सहन केल्या. अशा या राष्ट्रनायकाची 28 मे रोजी येणारी जयंती राज्यात दिमाखात साजरी झाली पाहिजे. या माध्यमातून त्यांची देशभक्ती घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र, हे कार्य त्यांच्या देशभक्ती व कर्तृत्वापुढे कमीच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेतून त्यांचा इतिहास, देशभक्ती, त्याग सर्वांपुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.