अकोला,
tur dal जिल्ह्यात तूर डाळीचा काळा बाजार होऊ नये व झालेली दरवाढ नियंत्रणासाठी तसेच डाळीच्या अवैध साठेबाजीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी जिल्हास्तरीय तपासणी पथक गठित करण्याचे आदेश दिले असून, या पथकामार्फत तूर डाळीच्या साठ्याची पडताळणी करण्यात येणार आहे. डाळींच्या साठ्याची तपासणी पथकाद्वारे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्यकाळात तूर आणि उडीद डाळींचे दर वाढत आहेत.
नियंत्रण ठेवण्यासाठी नवी दिल्ली येथील उपसंचालक सुभाषचंद्र मीणा यांच्या नेतृत्वात त्रिसदस्यीय केंद्रीय पथक अकोला दौर्यावर आले होते. त्यानंतर, जिल्ह्यात तूर डाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी व या डाळीच्या अवैध साठवणुकीला आळा घालण्यासाठी तूर डाळीच्या साठ्याची पडताळणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अरोरा यांनी 19 एप्रिल रोजी तपासणी पथक गठित करण्याचे आदेश दिले. tur dal आता या पथकामार्फत 28 एप्रिलपर्यंत गोदाम आणि साठवणुकीच्या ठिकाणी तूर व तूर डाळीच्या साठ्याची तपासणी करून पडताळणी केली जाणार आहे. जिल्हास्तरीय पथकाच्या तपासणीत दालमिल मालक, घाऊक विक्रेता व साठवणूकदारांनी खरेदी केलेली तूर व तूर डाळीच्या व्यवहाराची केंद्र शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्यात आली की नाही, याबाबतची तपासणीही केली जाणार आहे.