A tiger was seen in Moherli ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली प्रवेशद्वाराकडे जाणार्या मार्गावरच पट्टेदार वाघाचे मनसोक्त दर्शन पर्यटकांना झाले. कधी कधी अख्खे ताडोबा प्रकल्प फिरून आल्यावरही वाघ दिसत नाही. पण प्रकल्पात प्रवेशाच्या आधीच वाघाचे असे छानसे दर्शन झाले की पर्यटक खुप सुखावतो. सध्या उन्हाळा सुरू असल्याने ताडोबातील वाघाचे दर्शन वाढले आहे. या वाघाच्या डौलदार चालीचे चित्रिकरण पर्यटक राजेंद्र गर्गेलवार यांनी केले.
उन्हाच्या तीव्रतेने आणि पाण्यासाठी वाघ जंगलाबाहेर पडत आहे. रविवारी पर्यटकांच्या गर्दीत असाच एक देखणा वाघ मोहुर्लीच्या मुख्य रस्त्यावर सायंकाळी आढळला. A tiger was seen in Moherli त्यामुळे काही क्षणासाठी रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यात आजघडीला 250 च्यावर वाघ आहेत. एकट्या ताडोबा प्रकल्पात कमीत कमी 87 वाघांची अधिकृत आकडेवारी आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे पर्यटकांचा सर्वाधिक ओढा आहे. गतवर्षी अडीच लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी ताडोबा प्रकल्पाला भेट दिली आहे. यावर्षीदेखील पर्यटकांची गर्दी वाढत आहे.