अग्रलेख
dantewada naxal attack छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात ११ जवान हुतात्मा होण्याची २६ तारखेची घटना अनपेक्षित नाही, पण धक्कादायक आहे. एकीकडे नक्षलवाद्यांना वेसण घालण्यात आपले शासन-प्रशासन ब-यापैकी यशस्वी ठरलेले असल्याचा सार्वत्रिक समज असताना नक्षल्यांनी या घातपाताद्वारे आपले अस्तित्व दाखवून दिलेले आहे. dantewada naxal attack जिल्हा राखीव रक्षकांना नेणारे वाहन या स्फोटात उडवून दिले गेले आणि त्यात ११ जवानांचे बळी गेले. नक्षल्यांचे हल्ले नवे नाहीत. जवानांचे बळी नवे नाहीत. dantewada naxal attack नवे आहे ते हे वास्तव की, अद्याप नक्षल्यांचे भारताच्या अंतर्गत सुरक्षेपुढे असलेले आव्हान संपलेले नाही. त्यामुळे हा निर्णायक लढाईचा क्षण असून आता आक्रमकपणे नक्षलवाद्यांचा निःपात करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. dantewada naxal attack २०१४ मध्ये भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने सादर केलेल्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पाला विरोध करणारे, त्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारे नक्षलवादी नऊ वर्षांच्या काळात बरेच थंडावत गेले होते.
dantewada naxal attack पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सीमावर्ती भागांच्या संरक्षणासाठी बंदोबस्त करतानाच अंतर्गत सुरक्षेलादेखील प्राधान्य दिले. भारतातील अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात सर्वांत मोठा प्रश्न आहे नक्षलवादाचा. अनेक राज्यांमध्ये पसरलेला. त्यांचे बौद्धिक पाठीराखे अर्बन नक्षल म्हणून शहरांमध्ये वावरणारे आणि हाती शस्त्रे घेतलेल्या नक्षल्यांना रसद पुरवण्यासाठी झटणारे. dantewada naxal attack गेली किमान तीन-साडेतीन दशके नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार यासारख्या राज्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांच्या नाकीनऊ आणले आहेत. दशकभरापूर्वी नक्षल्यांच्या कारवाया ही जणू बातमीच नव्हती. dantewada naxal attack काही ना काही घातपाती स्वरूपाचे नेहमीच घडत असे. त्यानंतर केंद्रातील काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारचे मंत्री बैठका घेत असत आणि सर्व राज्यांना एकत्र आणून नक्षल्यांवर निर्णायक कारवाई करण्याची राणाभीमदेवी थाटातली घोषणा व्हायची. पाच-पन्नास पोलिस किंवा अन्य सुरक्षा जवानांचा जीव नक्षल्यांनी घेतल्याविना पुन्हा सरकार जागे होत नसे. dantewada naxal attack नक्षल्यांवर निर्णायक कारवाई कधीच झाली नाही. पण, गेल्या नऊ वर्षांत त्यांना जंगलांमध्ये घेरणे, त्यांची रसद बंद करणे, त्यांच्या शहरी पाठीराख्यांना वेसण घालणे, त्यांच्या कारवायांवर अंकुश आणणे, हे घडले आहे. dantewada naxal attack त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये ठार होणा-या नागरिकांच्या संख्येत मोठी घट झाली आणि त्यांच्याकडून केले जाणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही मोठ्या प्रमाणात घटले.
dantewada naxal attack अंतर्गत सुरक्षा हा केवळ बंदुका आणि शस्त्रास्त्रांनी हाताळण्याचा विषय नसतो. अंतर्गत सुरक्षेच्या मुद्याशी आपल्या देशात राहणारे लोक, त्यांचा परिसर, त्यांचे जगणे, त्यांचा रोजगार, त्यांना मिळणा-या सोयी-सवलती, त्यांचा शासन-प्रशासनावरील विश्वास असे अनेक आयाम असतात. नक्षलवाद हा सुरक्षेहून अधिक सामाजिक आणि राजकीय प्रश्न आहे. dantewada naxal attack मोदी सरकारने विकासाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करून दुर्गम, ग्रामीण भागातील, आदिवासीबहुल क्षेत्रातील अस्वस्थता कमी केली. त्यामुळे नक्षल्यांना मिळणारे समाजाचे पाठबळ कमी झाले. कोणताच संपूर्ण समाज सरकारच्या बाजूने पूर्णपणे कधीच येत नाही. समाजाला म्हणजे आपल्या देशबांधवांना-भगिनींना सरकार आपल्या बाजूने आहे, असा विश्वास हवा असतो आणि विभाजनवाद्यांना ताकद देणे आपल्या व देशाच्या हिताचे नाही, एवढे त्यांना समजावून सांगण्याची गरज असते. dantewada naxal attack मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात हे काम मोठ्या प्रमाणात झाले. विकास दूरदूरपर्यंत पोहोचू लागला. कारण मोदी सरकारने नेमकेपणाने विकासाला प्राधान्य दिले. आज देशभरात रस्ते- महामार्गांचे- रेल्वेमार्गांचे जाळे निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी छोटे-मोठे उद्योग सुरू झाले व होत आहेत. स्टार्ट अप्सपासून गृहोद्योगांपर्यंत सर्वांना पाठबळ देण्यासाठी सरकारच्या विविध प्रकारांच्या योजना आहेत. dantewada naxal attack माणसांचे पोट भरले, मूलभूत गरजा भागल्या आणि त्याच्या वाट्याला शांततेचे जीवन आले की, त्यांना फारसे काही नको असते.
उपाशी पोट किंवा अन्यायाची जाणीव अस्वस्थता निर्माण करते आणि अस्वस्थतेतून बंडखोरीचा जन्म होतो. dantewada naxal attack अशी अस्वस्थता नक्षल्यांसारख्या देशद्रोही तत्त्वांना बळ देत असते. छत्तीसगडच्या घटनेने हेच पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे. त्यामुळे यापुढच्या काळात नक्षल्यांच्या विरोधात सर्व पातळ्यांवर आघाडी उघडणे अपरिहार्य आहे. dantewada naxal attack नक्षलग्रस्त भागातील लोकांना हे सांगण्याची गरज आहे की, नक्षलवाद्यांचा परिवर्तनाचा मार्गच मुळापासून चुकीचा आहे आणि लोकशाहीच्या विरोधातला आहे. नक्षलवादी चळवळ देशातील सुमारे एक तृतीयांश जिल्ह्यांमध्ये, प्रामुख्याने भारताच्या पूर्व आणि मध्य भागात सक्रिय आहे. नक्षलवाद्यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील भागात एक समांतर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. अद्याप त्यांचे रेड कॉरिडॉरचे स्वप्न विरलेले नाही. dantewada naxal attack शेकडो ग्रामपंचायतींमध्ये नक्षल्यांच्या भीतीमुळे निवडणुका होत नाहीत. दुर्गम भागातील अनेक शाळा ओस पडलेल्या आहेत. विकासाचे काम करणा-या सरकारी यंत्रणा दुर्गम भागांत नक्षल्यांच्या भीतीपोटी पोहोचत नाहीत. नक्षलवादी हे विकासाचे आणि त्यामुळेच लोकतांत्रिक पद्धतीने विकासाला पात्र असलेल्या लोकांचे विरोधक आहेत, हे जितक्या लवकर दुर्गम भागातील जनतेच्या मनावर बिंबेल, तेवढ्या लवकर त्यांना मिळणारे पाठबळ कमी होईल. dantewada naxal attack सशस्त्र क्रांतीतूनच परिवर्तन होऊ शकते, असा नक्षल्यांचा विश्वास आहे आणि तोच मुळात देशविरोधी आहे, हे आता उच्चरवाने सांगण्याची वेळ आली आहे.
dantewada naxal attack एवढ्या महाकाय देशात आणि त्यातही लोकतंत्राशी निष्ठा असलेल्या व्यवस्थेत बदल घडवून आणणे सोपे नसते. त्यासाठी काळ जावा लागतो. मात्र, ते नक्षल्यांना मान्य नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि जीवितहानी झाली. गेल्या काही वर्षांत या संघर्षात नागरिक, सुरक्षा जवानांसह हजारो लोक मारले गेले. dantewada naxal attack नक्षलवाद्यांनी सरकारी इमारती, पायाभूत सुविधा आणि अगदी शाळा व रुग्णालयांवरही हल्ले केले. त्यांनी राजकारणी, पोलिस अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा दलांचे जवान आणि इतरांनाही लक्ष्य केले. छत्तीसगडमधील घटना असे सांगते की, नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करून ती निगुतीने राबविण्याची आवश्यकता आहे. dantewada naxal attack राष्ट्रविरोधी तत्त्वांविरुद्ध झिरो टॉलरन्सची भूमिका केंद्राने घेतली आहेच. जम्मू-काश्मीरसारख्या भागात बदल दिसतो आहे. ईशान्येतील विभाजनवाद्यांना आवर घालण्यात चांगले यश आलेले दिसते. आता पाळी नक्षलवाद्यांची आहे. dantewada naxal attack त्यांना मोदी सरकारने केंद्रीय पातळीवरून कायमचा धडा शिकवण्याची आवश्यकता आहे.
गरज असेल तर नक्षलग्रस्त भागांसाठी वेगळा कृती कार्यक्रम तयार करावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, सक्षम अधिकारी व कर्मचारी द्यावेत. dantewada naxal attack या सर्वांमार्फत नक्षलग्रस्त भागांत सर्व प्रकारच्या विकासाच्या योजना घराघरांपर्यंत पोहोचतील, याची खातरजमा केली पाहिजे; जेणेकरून कोणत्याच गावात, कोणत्याच घरी नक्षल्यांना आधार मिळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सशस्त्र नक्षलवाद्यांची संख्या फारच फार तर काही हजारांत असेल. dantewada naxal attack अगदी एक-दीड लाख असेल. त्यांना जंगलांमध्ये, त्यांच्या ठावठिकाणांमधून हुडकून काढले पाहिजे आणि आक्रमक पद्धतीने त्यांचा बीमोड केला पाहिजे. हिंसाचार हे त्यांचे तत्त्वज्ञान आणि कृती कार्यक्रम असेल तर त्याचे उत्तर बंदुकांनी देण्याची तयारी आता केली पाहिजे. dantewada naxal attack काँग्रेसच्या काळात कधीच नक्षलवाद्यांच्या विरोधात निर्णायक लढाई झालेली नाही. ती आता होईल, अशी जनतेची अपेक्षा आहे आणि तशी ती होणे ही आतापर्यंतच्या सर्व हुतात्म्यांसाठी श्रद्धांजली ठरेल.