IGNOU हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ

- उच्च शिक्षणासाठी IGNOU चे कार्य प्रशंसनीय : राष्ट्रपती

    दिनांक :03-Apr-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी सांगितले की, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) ने 'उच्च शिक्षणात प्रवेश' याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशंसनीय भूमिका बजावली आहे.

IGNOU
 
राष्ट्रपती मुर्मू IGNOU च्या ३६ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून संबोधित करत होत्या. आज पदवी, पदविका आणि प्रमाणपत्रे मिळविलेल्या 2 लाख 80 हजार विद्यार्थ्यांपैकी महिला विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 55 टक्के असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आज निम्म्याहून अधिक सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनी आहेत. 'अ‍ॅक्सेस टू हायर एज्युकेशन'ला प्रोत्साहन देण्यासाठी इग्नूने प्रशंसनीय भूमिका बजावली आहे. मला हे लक्षात घेता विशेष आनंद होत आहे की एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे 50 टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत आणि 50 टक्के महिला आहेत.
 
पुढे बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या, शिक्षणाची पणती अंधारात प्रकाशाचे काम करत असते. त्या म्हणाल्या, मला हे जाणून विशेष आनंद झाला की तुरुंगांतील हजारो कैदी देखील IGNOU मधून शिक्षण घेत आहेत. तुरुंगातील कैद्यांचे पुनर्वसन आणि तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांना चांगले जीवन सुरू करण्यासाठी हे शिक्षण उपयुक्त ठरेल. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेणे कठीण जाते. IGNOU सारख्या संस्था अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मदत करत आहेत. अशा प्रकारे दूरस्थ शिक्षणाची व्यापक सामाजिक-आर्थिक उपयुक्तता आहे. विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर करताना IGNOU चे कुलगुरू नागेश्वर राव म्हणाले की, हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे. सध्या येथे 35 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात इतर ४० देशांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.