पाणी टंचाईचा बळी चिमुकलीचा विहिरीत पडून मृत्यू

05 Apr 2023 20:31:17
बुलढाणा, 
Block the way : शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या देऊळघाट ग्रामपंचायतच्या दुर्लक्षपणामुळे व जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गेल्या 70 वर्षापासून गावात नळ योजनेचे पाणी पोहचत नसल्याने गावकर्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दि. 4 एप्रिल रोजी गावातील पडक्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी आई सोबत गेलेल्या अंजली भारत शेजोळ (वय 9 वर्षे) हि विहिरीत पडून गंभीर जखमी झाली आज उपचारा दरम्यान तिचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला. संतप्त गावकर्‍यांनी अजिंठा महामार्गावर असलेल्या देऊळघाट रस्त्यावर प्रशासनाविरोधात प्रचंड नारेबाजी करत रास्ता रोको आंदोलन छेडले.
 
Block the way
 
देऊळघाट या गावाला गेल्या 70 वर्षापासून पाणीटंचाईचा कायम स्वरूपी असते या गावातील धनगर वाडा परिसरात असलेल्या विहिरीवर आपल्या आईसोबत अंजली शेजोळ ही चिमुकली गेली होती. या विहिरीच्या कठड्याची उंची कमी असल्यामुळे तसेच विहिरीवर लोखंडी जाळी नसल्याने ही चिमुकली अचानक तोल जाऊन विहिरीत पडली. (Block the way) गावकर्‍यांनी तिला बाहेर काढल्यावर गंभीर जखमी अवस्थेत उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा 5 एप्रिल रोजी मृत्यू झाला. संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन छेडले.
 
 
या (Block the way) आंदोलनात गावकर्‍यासमवेत भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस सतिष भाकरे पाटील मल्हार नवयुवक सेना प्रदेशअध्यक्ष नंदू लवंगे सहभागी झाले होते. दरम्यान जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या विहिरीवर तिन फुंट उंच बांधकाम करून सरंक्षक जाळी बसविण्याचे तसेच गावातील पाणीपुरवठा सुरळीत करून प्रत्येक घरी नळयोजना राबविण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर गावकर्‍यांनी तिन तास छेडलेले रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. प्रशासनाने व ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईग्रस्त या गावात अंजली शेजोळ या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0