तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Sai Baba : बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी जबलपूर येथे साईबाबां बद्दल वादग‘स्त वक्तव्य केल्याने राळेगाव येथील साई भक्तांनी सोमवार, 3 एप्रिल रोजी निषेध नोंदवित या बाबत राळेगाव पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. साईबाबांच्या प्रति बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव नाही तसेच कोणीही कोल्हाची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही असेही वक्तव्य केले होते. त्यामुळे साई भक्तांंच्या भावना दुखावल्या गेल्या असून धीरेंद्र शास्त्री यांनी साई भक्तांची माफी मागावी तसेच धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक‘मावर बंदी घालावी, अशी मागणी राळेगाव येथील साई भक्तांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.