साखरखेर्डा,
देव आणि भक्तांचा संगम Hari Chaitanya Maharaj श्री रामकथेमुळे होतो. ईतकेच नाही तर अज्ञानाची गाठ ही श्री राम कथेने सुटते असा हितोपदेश श्री गुरूदेव आश्रम,पळसखेड सपकाळ येथील स्वामी श्री हरिचैतन्य स्वामी यांनी उपस्थित भाविक भक्तांना केले. Hari Chaitanya Maharaj श्री.गुरू हरिचैतन्य स्वामी 4 एप्रिल रोजी गोरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहात भाविकांना मौलिक प्रबोधन केले.
यावेळी ह.भ.प.एकनाथ महाराज येवले,ह.भ.प.डॉ. आटोळे महाराज, ह.भ.प. विकास महाराज काळे,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज काळे,ह.भ.प.रामदास काटे,हभप.चरण थिगळे,हभप.पवन काळे,हभप.अजय गाडे,मा.प्राचार्य डी.एन्. पंचाळ, अनिल पंचाळ,विष्णू चव्हाण,सर्जेराव पंचाळ, रवि पंचाळ ,विजय चव्हाण आदींसह गावातील समस्त भाविकांची उपस्थिती होती.याप्रसंगी पुढे प्रबोधन करतांना स्वामीजी म्हणाले की, जीवन जगत असतांना सुलभ आणि दुर्लभ अशा दोन गोष्टी अनुभवायला येतात. सूत,दारा आणि धन ह्या गोष्टी सुलभतेने मिळतात.
संतांच्या अमृतमय वाणीतून होणार बोध ह्या गोष्टी सहजतेने उपलब्ध होत नाही. त्या दुर्लभ असतात. पूण्य फळाला आल्यावर संतभेट होते व संतसमागम हरिकथेने मिळतो.आजच्या वातावरणात गावागावातील युवक व बालकांना प्रबोधनाची खर्या अर्थाने आवश्यकता असून आपल्या गावात चालू असलेल्या Hari Chaitanya Maharaj श्री राम कथेतून हे प्रबोधन मिळते.रामकथा श्रवणाने युवक व बालक सुसंस्कारित होऊन पुढे समाजाला दिशा देण्याचे काम करतात.बहुसंख्य गावकर्यांनी संतसमागमाव्दारे होत असलेल्या रामकथेचा आस्वाद घ्यावा असे संबोधित केले. स्वामीजींचा प्राचार्य डी.एन्. पंचाळ , स्वामीजींचे हार व शाल अर्पण करून स्वागत केले.