नवी दिल्ली,
देशाचे दुसरे सीडीएस अर्थात् (CDS General Chauhan) चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी शनिवार आणि रविवारी पश्चिम बंगालमधील त्रिशक्ती कोअरच्या जीओसीसोबत हवाईतळ आणि दुर्गम (फॉरवर्ड) भागातील लष्करी तळांचा दौरा केला.
माहितीनुसार, सीडीएस जनरल चौहान (CDS General Chauhan) यांनी सुकनामध्ये त्रिशक्ती कोअर मुख्यालयाला भेट दिली. जवानांसोबत संवाद साधत कमांडला कठोर प्रशिक्षण देण्यासंबंधी अधिक दक्ष राहण्याचा आदेश दिला. शिवाय 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. जवानांनी सूचना औद्योगिक क्षेत्रातील नवे संशोधन, सायबर गुन्हे आणि उपायांबाबत सावध राहण्यास सूचित केले. संरक्षण मंत्रालयानुसार, सीडीएस जनरल चौहान यांनी मागील दिवसांत पूर्व सिक्कीममधील हिमस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनासोबत नागरिकांना सुरक्षा प्रदान केल्याबद्दल जवानांचे अभिनंदन केले होते.