नागपूर,
महालक्ष्मी मंदिर (Mahalakshmi temple) मधुबन ले आऊट येथे चैत्र गौरीचे हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता.महिलांनी चैत्र गौरीचे पूजन करून, पारंपारिक खेळ खेळल्या, उखाणे स्पर्धेने कार्यक्रमात रंगत आली. ऋचा पंडित, जया पुरोहित, नीता दातार, स्मिता पंडित, प्रीती लांबे, शारदा देशमुख, सीमा हर्षे, कल्याणी लांबे,आसावरी कोठीवान, वैशाली कुलकर्णी, शिल्पा वरगंटीवार, कामडी,रेगुंटवार,यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
स्वरा शहादाणी, काव्या लेहगावकर,आरोही,अंतरा ढोकणे, आरोही शिंपी या लहान कन्यांनी कार्यक्रमात भाग घेतला, कार्यक्रमासाठी मंदिराचे अध्यक्ष शरदचंद्रजी लांबे यांनी (Mahalakshmi temple) मंदिर समाजभवन व इतर व्यवस्था उपलब्ध करून दिली. महालक्ष्मीची आरतीनंतर, कैरी डाळ, कैरी पन्हे व खिरापत वाटुन कार्यक्रमाची सांगता झाली.
- सौजन्य:आसावरी कोठीवान,संपर्क मित्र