तभा वृत्तसेवा
पुसद,
ISRO : रॉकेट म्हटलं की थोरामोठ्यांना त्याचे फार आकर्षण असते. ती पाहण्याची संधी सर्वांनाच उपलब्ध होते असे नाही. परंतु पुसद येथील माऊंट झी लिट्रा स्कूलच्या प्रांगणात बुधवार, 12 एप्रिलला इस्रोचे रॉकेट ‘जीएसएलव्ही-4’ची प्रतिकृती आकाशात झेपावणार आहे. पुसदमध्ये या शाळेला इस्रोचे नोडल सेंटर उघडण्याची परवानगी मिळाली असून इस्रोचे शास्त्रज्ञ धनेश बोरा, युवा शास्त्रज्ञ अजिंक्य कोत्तावार यांच्या मार्गदर्शनात अवकाश संशोधनासाठी प्रयोगशाळा विकसित करण्यात येणार आहे.

ISRO प्रयोगशाळेतून रॉकेट इंजिनचे कार्य, त्याच्या भागांची माहिती, ते कसे तयार होते, लॉन्चिंग कसे करतात, दोन स्टेज लॉन्चिंग फ्लाईट कसे होते, रॉकेटची क्षमता, एरोडायनॅॅमिक ऑरबिटल मेकॅनिक्स, रॉकेट अॅनाटॉमी, परिक‘मेबाहेरील रिकव्हरी आदींची प्रात्यक्षिकांसह माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने माऊंट झी लिट्रा स्कूलला हे नोडल सेंटर उघडण्याची परवानगी मिळाली आहे. बुधवारी इस्रोशी संलग्नित शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनात ‘जीएसएलव्ही-4’ प्रतिकृतीचे सादरीकरण जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता करण्यात येणार आहे.
पुसदमधील अवकाश अभ्यासक विद्यार्थ्यांसह पालकांना आकाशात झेपावणार्या रॉकेटच्या प्रतिकृतीची अनुभूती घेता येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष विक‘म गट्टाणी, उपाध्यक्ष अमर आसेगांवकर, सचिव संदीप जिल्हेवार, संचालक भागवत चिद्दरवार, मु‘याध्यापक मंजूषा जोशी यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.