क्रीडा भारती स्थापना दिवस उत्साहात

    दिनांक :09-Apr-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
Krida Bharati : स्थानिक बाबाजी दाते महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात क‘ीडा भारतीचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. क‘ीडा भारतीची स्थापना हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी झाल्यामुळे क‘ीडा भारती दरवर्षी स्थापना दिवस साजरा करत असते.
 
Krida Bharati
 
या कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब पारवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नावलेकर, प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक धनंजय पाचघरे, वक्ते म्हणून योगाचार्य महेश जोशी, क‘ीडा भारतीच्या प्रांत सहमंत्री मीरा फडणीस, माजी नगरसेवक प्राचार्य डॉ. अमोल देशमुख व कीर्ती राऊत मंचावर उपस्थित होते.
 
 
कार्यक‘माची सुरुवात हनुमान पूजनाने झाली. अभ्यंकर कन्या शाळेतील राष्ट्रीय खोखोच्या खेळाडूंनी ‘खेल खिलाडी खेल..’ हे गीत सादर केले. आपल्या प्रास्ताविकामधून मीरा फडणीस यांनी क‘ीडा भारतीचे सर्व कार्यकर्ते तन-मन-धनाने सहकार्य करून चारित्र्यवान खेळाडू निर्माण होण्याकरता क‘ीडा भारती (Krida Bharati) सतत प्रयत्नशील असते, असे सांगितले. राष्ट्रीय व प्रांत अधिवेशनांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिला जाते. तसेच क‘ीडा क्षेत्रातील विविध समस्यांचे निराकरण करण्याकरिता क‘ीडा भारती नेहमी प्रयत्नशील असते, असेही त्यांनी सांगितले.
 
 
यावेळी क‘ीडा भारतीचे (Krida Bharati) जिल्हा मंत्री अविनाश जोशी यांनी नवीन कार्यकारणीची घोषणा केली. यात जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर व प्राजक्ता टिकले, जिल्हा मंत्री माणिक पांडे, सहमंत्री अभिजित पवार, क‘ीडा केंद्रप्रमुख अविनाश जोशी याप्रमाणे जबाबदारी देण्यात आली. तसेच नगर अध्यक्ष कीर्ती राऊत, नगर उपाध्यक्ष मनीषा आखरे, नगरमंत्री श्रुती कोलवाडकर, सहमंत्री नयन चौधरी, क‘ीडा केंद्रप्रमुख शितल दरेकर, कोषाध्यक्ष अभिजित दाभाडकर याप्रमाणे जबाबदारी देण्यात आली. सदस्य म्हणून अजय म्हैसाळकर, दिलीप राखे, रुचिता वानखेडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत पांडे व निलेश भगत यांना दायित्व देण्यात आले.
 
 
कार्यक‘माचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उदय नावलेकर यांनी खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात कठोर परिश्रम करून यश संपादन करण्याकरता मार्गदर्शन केले. वक्ते महेश जोशी यांनी क‘ीडा भारतीचा कार्यकर्ता कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले. संचालन उपमु‘याध्यापक अविनाश जोशी यांनी, तर आभारप्रदर्शन श्रुती कोलवाडकर यांनी केले. यावेळी मोठ्या सं‘येने खो-खो, हॉकीसह अनेक खेळांचे खेळाडू, त्यांचे पालक उपस्थित होते.