आर्णीच्या अरविंद सरोदे या शेतकर्‍याने शेतशिवारात फुलविली फळबाग

13 May 2023 17:18:29
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
माणसाच्या अंगी जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी असेल तर तो माणूस जीवनात मोठी प्रगती करू शकतो. (Arni farmer Arvind Sarode) आर्णी येथील शेतकरी अरविंद सरोदे यांनी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीकडे लक्ष देत शेतात फळबाग लागवड प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने तो प्रेरणादायी ठरला आहे.
 
Arni farmer Arvind Sarode
 
आर्णी येथील (Arni farmer Arvind Sarode) शेतकरी अरविंद सरोदे यांचे तेंडोळी मार्गावरील आर्णी शेतशिवारात 16 एकर शेती आहे. त्यांनी पाच एकर शेतात फळबागांची लागवड केली. तीन एकरात केशर, दशहरी आंब्याच्या झाडांची लागवड केली. यामध्ये चिकूचीही झाडे लावली. दोन एकरात संत्राची लागवड केली आहे. फळबाग पिकांवर जैविक पद्धतीने फवारणी करतात. आंबा चांगला आल्याने झाडाला पिकलेले आंबे तोडुन मागणी करणार्‍या व्यक्तींच्या घरपोच आंबे पोचूनसुद्धा देतात. पिकलेले आंबे तोडणी करून आर्णी बाजारपेठेत विकतात.
 
 
शेती (Arni farmer Arvind Sarode) करताना शेतकर्‍यांवर अनेक संकटे येतात. कधीकधी शेतीला लावलेला खर्चसुद्धा निघत नाही. म्हणून ते पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग शेती करू लागले. आधुनिक शेतीला सेंद्रिय खतांचा उपयोग व्हावा, यासाठी त्यांनी 20 जनावरे पाळली आहेत. शेतात ते दरवर्षी शेणखत टाकतात. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारत आहे. त्यांना दरवर्षी खर्च वजा जाता फळबागेतून दिड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळते. यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत ते आधुनिक शेतीकडे वळले. शेतीकडे लक्ष देण्याबरोबरच निसर्गरम्य वातावरणात राहायला मिळते, याबद्दल अरविंद सरोदे यांनी समाधानी असल्याचे सांगितले.
Powered By Sangraha 9.0