छत्रपती शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त गटचर्चा स्पर्धा

    दिनांक :13-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
बाबा कंबलपोष उर्दू हायस्कूल शाळेत (Chhatrapati Shahu Maharaj) राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना इंधन बचतीचे महत्व पटवून देण्याचा उद्देशाने इंधन बचत विषयावर गटचर्चा आयोजित करण्यात आली होती. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, पेट्रोलियम मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य समन्वयक द्वारा 24 एप्रिल ते 7 मे दरम्यान ऊर्जा संरक्षण नेट झिरोच्या दिशेने या विषयाखाली गटचर्चा आयोजित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार या शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त गटचर्चा कार्यक्रम घेण्यात आला.
 
Chhatrapati Shahu Maharaj
 
कार्यक्रमात (Chhatrapati Shahu Maharaj) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबाबत व पर्यावरण इंधन बचत व ऊर्जा संरक्षण बाबत माहिती देण्यात आली. गटचर्चेत एकूण 2 गट होते त्यात विद्यार्थ्यांनी सक्रियपणे सहभाग नोंदविला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिन साजरा करून विद्यार्थ्यांना निकाल वाटप करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी, मुख्याध्यापक सय्यद इरफान, सहा-शिक्षक खालिद शेख, अजीज गफ्फार, तलत परवीन, फिरदोस शाहीन, फौजिया आफ्रिन, नाजीम खान, नौशाद अली, अक्रम बेग व अजरा परवीन उपस्थित होते.