तभा वृत्तसेवा
ढाणकी,
Caste validity certificate : उमरखेड तालुक्यातील बिटरगाव (बु) ग‘ामपंचायत मधील एका सदस्यावर अपात्रतेची कारवाई वेळेच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने झाली.
बिटरगाव (बुद्रुक) येथील ग‘ामपंचायत सदस्य रेणुका रामा अंकुरवाड 2021 ची सार्वत्रिक निवडणूक लढवून ग‘ामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या. शासन परिपत्रकानुसार त्यांनी 17 जानेवारी 2023 पर्यंत आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र वेळोवेळी सूचना आणि प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देऊनही त्या जातवैधता प्रमाणपत्र सादर करू शकल्या नाहीत. तसेच त्यांनी प्रमाणपत्र सादर न करू शकल्याचे कोणतेही ठोस कारण दिले नाही. तसेच त्या कोणत्याही सुनावणीला हजर नव्हत्या. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी रेणुका अंकुरवाड यांचा अपात्रता आदेश जारी केला. या संदर्भात अॅड. अमित बदनोरे यांच्यामार्फत राजेश पिटलेवाड यांनी तक‘ार केली होती.