काँग्रेसच्या विजयाचे खरे चाणक्य सुनील कानुगोलू

14 May 2023 18:06:22
बंगळुरू,
Sunil Kanugolu : कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयाचे श्रेय राहुल गांधी यांना दिले जात असले तरी, कर्नाटकात काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती बनवणार्‍या आणि या निकालाची पटकथा लिहिणार्‍याचे नाव म्हणजे (Sunil Kanugolu) 'सुनील कानुगोलू'. ही अशी व्यक्ती आहे, जी कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रमुख रणनीतीकारांपैकी एक आहेत. संपूर्ण निवडणुकीदरम्यान त्यांनी जनतेशी विस्तृत आणि तपशीलवार संपर्क साधला. त्यासाठी त्यांनी रणनीती आखली.
 
Sunil Kanugolu
 
भाजपाची निवडणूक भाषणे (Sunil Kanugolu) आणि अजेंड्याला छेद देत त्यांनी भ्रष्टाचार, गैरकारभाराच्या आरोपात अडकलेल्या भाजपाशासित सरकारचा पर्दाफाश केला. विधानसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या यशाचे संपूर्ण श्रेय काँग्रेस कार्यकर्त्यांना जाते, पण प्रचाराच्या नवनवीन पद्धती शोधून काढणे, लोकांची नाडी जाणून घेण्यासाठी वेगवेगळे सर्वेक्षण करणे आणि त्याद्वारे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनीती आखणे ही जबाबदारी सुनील कानुगोलू यांच्या खांद्यावर होती. जाहीर झालेल्या निकालांवरून असे स्पष्ट झाले की, त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
 
गेल्यावर्षी मार्चमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश
गेल्या वर्षी मार्चमध्ये काँग्रेसने (Sunil Kanugolu) सुनील कानुगोलू यांना निवडणूक रणनीतिकार म्हणून पक्षात स्थान दिले होते. काँग्रेसने गेल्या वर्षी मे महिन्यात 2024 साठी टास्क फोर्सची स्थापना केली होती. यात निवडणूक रणनीतिकार सुनील कानुगोलू यांचा समावेश करण्यात आला. त्यांनी यापूर्वी डीएमके, एआयएडीएमके आणि भाजपसोबतही काम केले आहे. त्यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशमध्ये भाजपासाठी, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुक आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकसाठी रणनीती तयार केली. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अनुपस्थितीत त्यांनी अण्णाद्रमुकसाठी रणनिती आखली आणि पक्षाने चमकदार कामगिरी केली. पक्षाच्या रणनीतीला चालना देण्याचे श्रेय त्यांना जाते.
 
 
सुनील कानुगोलू (Sunil Kanugolu) यांनी 2014 च्या आधी प्रशांत किशोर यांच्यासोबतही काम केले होते. मॅकिन्से यांचे पूर्व सल्लागार सुनील कानुगोलू हे 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख घटक होते आणि त्यांनी भाजपाच्या असोसिएशन ऑफ बिलियन माईंड्सचे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांनी एबीएमचे नेतृत्व केले आणि उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपाच्या निवडणूक प्रचारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सर्व निवडणुकांमध्ये भाजपा जिंकला किंवा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला.
Powered By Sangraha 9.0