कृषी महाविद्यालय स्थापनेला गती मिळणार

    दिनांक :15-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
agricultural college गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनेतून विकास कामे सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या धडाकेबाज निर्णयामुळे विधानसभा क्षेत्रातील विकास कामांना निधी उपलब्ध आहे. कुडवा परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालय निर्मिती व कृषी महाविद्यालय स्थापनेसाठी गती मिळणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील कटंगीकला येथे आ. अग्रवाल यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या 12 लाख निधीतून होणार्‍या विकास कामांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.
 

palnet 
 
यावेळी पंचायत समिती सदस्य विनोद बिसेन, भिकाजी चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य नंदू बिसेन, तालुका भाजपाध्यक्ष धनलाल ठाकरे, सरपंच मोहिनी वर्‍हाडे, माजी पंचायत समिती सदस्य अखिलेश सेठ, उपसरपंच अखिल सिंह, भाजप महामंत्री कुणाल बिसेन, पोलिस पाटील उमेश बावणकर, agricultural college माजी सरपंच पुरुषोत्तम राऊत, नुरुनाथ दिहारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी विनोद बिसेन म्हणाले, आ. अग्रवाल यांच्या पुढाकारानेच कटंगीकला येथे सिमेंट रस्ते बांधकाम, जलशुद्धीकरण केंद्र आदी मुलभूत सोयी उपलब्ध झाल्या असल्याचे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.