चांदूर रेल्वे कृउबासवर गणेश आरेकर अविरोध

उपसभापती रवींद्र देशमुख

    दिनांक :18-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
चांदूर रेल्वे, 
गुरूवारी झालेल्या (Chandur Railway Kriubas) चांदूर रेल्वेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत सभापतीपदी गणेश आरेकर तर उपसभापतीपदी रवींद्र देशमुख यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली. स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. त्यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालकांसह माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप उपस्थित होते.
 
Chandur Railway Kriubas
 
कृषि उत्पन्न बाजार समितीची (Chandur Railway Kriubas) निवडणूक 28 एप्रिल रोजी झाली आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वातील काँग्रेस प्रणित सहकार पॅनलने 18 पैकी 17 जागा निवडून आणत एकहाती सत्ता मिळविली होती. गुरूवारी झालेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी प्रथम सकाळी 11 वाजता सर्व नवनियुक्त संचालकांची बैठक माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या घरी पार पडली. त्यावेळी सर्व संचालकांनी एकमताने गणेश आरेकर आणि रवींद्र देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
 
 
त्यानंतर बाजार समितीत (Chandur Railway Kriubas) जाऊन प्रशासकीय प्रक्रियेद्वारे सभापती व उपसभापती पदाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरविले. यावेळी प्राधिकृत अधिकारी प्रीती धामणे आणि एम. एस. मनसुटे यांनी प्रक्रिया पार पाडली. यावेळी नवनियुक्त संचालकांसह सुभाष अग्रवाल, श्यामसुंदर पनपालिया, सुरेश जाधव, प्रशांत कोल्हे, प्रभाकर वाघ, हरिभाऊ गवई, तेजस भेंडे, पूजा देशमुख, वर्षा वाघ, वसंत गाढवे, अतुल चांडक, मंगेश धावडे, राजेंद्र राजनेकर, रामेश्वर वानखडे, रावसाहेब शेळके यांच्यासह परीक्षित जगताप, अमोल होले, हर्षल वाघ, प्रदीप वाघ, भानुदास गावंडे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.